*कन्हान स्वस्त राशन दुकानदारांना सहकार्य करण्याची मागणी*
*रास्त भाव दुकानदार संघटनेचे नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलीस निरिक्षक यांना निवेदन.*
*मंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२१ पासुन सकाळी ०८ ते १२ वाजता पर्यंत एप्रिल व मे या दोन महिन्याचे स्वस्त धान्य वाटप सुरु होणार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असुन नागरिकांचे राशन दुकानदारांना कसल्या ही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने कन्हान परिसरात कोरोना महामारीची वाढती संख्या लक्षात घेत रास्त भाव दुकानदार संघटने च्या पदाधिकार्यांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद चे मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना निवेदन देऊन सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात, नागपुर जिल्ह्यात व कन्हान शहर व परिसरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने संपुर्ण राज्यात नियमावली कडक केली असुन अतिआवश्यक, वैद्यकीय सेवा वगळुन, भाजीपाला, फळविक्रेता, किराणा स्टोर्स व इतर दुकानदारांना ७ ते ११ वाजता पर्यंत वेळ देऊन लाॅकडाऊन करयात आले आहे. त्यामुळे गरीब, मजदुर अश्या कितीतरी लोकांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ आली असुन हे लोक सरकारी स्वस्त धान्यावर अवलंबुन असतात. कन्हान शहरात नऊ स्वस्त राशन दुकान असुन मंगळवार दिनांक २७ एप्रिल २०२१ पासुन सकाळी ०८ ते १२ वाजता पर्यंत एप्रिल व मे या दोन महिन्याचे स्वस्त धान्य वाटप सुरु करण्यात येत असुन हे धान्य वाटप करतांनी राशन कार्ड धारकांनी कुठल्याही प्रकारचे गोंधळ करू नये, मास्क, सेनिटाइझर, सोशल डिस्टेसिंग व शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी कन्हान-पिपरी नगर परिषद प्रशासनाने व कन्हान पोलीस प्रशासनाने प्रत्येक राशन दुकानावर किमान दोन कर्मचारी ठेवुन राशन दुकानदारांना सहकार्य करावे अशी मागणी रास्त भाव दुकान दार संघटने च्या स्वस्त राशन दुकानदारांनी कन्हान-पिपरी नगरपरिषद चे मुख्यधिकारी गिरीश बन्नोरे व कन्हान पोलीस स्टेशनचे परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक, कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
याप्रसंगी सुनिता मानकर, संदीप कक्कड, कन्हान-कांन्द्री दुकानदार महासंघाचे सचिव प्रशांत मसार, नगरसेविका रेखा टोहणे, अजय लोंढे, सुर्यभान झोडावने, सुचना चहांदे, रजनी वानखेडे, शारदा दुधभावने, नितिन मेश्राम, स्वप्निल मानकर, गोपाल झोपट, हंसराज मदनानी सह आदि स्वस्त राशन दुकानदार उपस्थित होते.