Breaking News

*महाराष्ट्र राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव संबंधित अधिकारी यांचा बेजबाबदार पणामुळे वाढला – महेंन्द्र भुरे* *वैद्यकीय शिक्षण व संसोधन , तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग च्या अधिकार्यांवर कारवाई करुन तात्काळ पदावरुन हटविण्याची मागणी*

*महाराष्ट्र राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव संबंधित अधिकारी यांचा बेजबाबदार पणामुळे वाढला – महेंन्द्र भुरे*

 

*वैद्यकीय शिक्षण व संसोधन , तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग च्या अधिकार्यांवर कारवाई करुन तात्काळ पदावरुन हटविण्याची मागणी*

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्रात विशेष म्हणजे नागपुर , पुणे , अकोला , औरंगाबाद , मुंबई , जळगाव , भंडारा , येथे सर्वात जास्त कोरोना विषाणुने बाधित रुग्ण असुन सर्वात जास्त महाराष्ट्रातील लोक कोरोना चा विषाणु मुळे मृत्यु होत असुन प्रत्येक घरातील एक व्यक्ति मरण पावला असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नसुन भयवाह परिस्थिति निर्माण झाली आहे . प्रायव्हेट डाॅक्टर्स कोरोना रुग्णांना व त्यांचा नातेवाईकांना पैशाने लुटत असुन पैशा अभावी ट्रिटमेंट न मिळाल्याने ग्रामीण भागतील अनेक रुग्ण दररोज दगावत असुन सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांना ट्रिटमेंट करण्याची व्यवस्था करण्यात आली नसुन सरकारी रुग्णालयात डाॅक्टर्स उपलब्ध नाही आहे व काही रुग्णालयात डाॅक्टर्स , नर्स असल्यावरही कोरोना रुग्णांचा ट्रिटमेंट व्यवस्थित करीत नाही आहे . सरकारी रुग्णालयात कोरोना ची टेस्ट केल्यानंतर पाॅजीटिव निघतो तर प्रायवेट लैब मध्ये कोरोना टेस्ट केल्यावर तोच रुग्ण निगेटिव निघतो . त्यामुळे सरकारी रुग्णालयाचा डाॅक्टरांना रुग्णांची स्वॅब सुद्धा घेता येत नाही , ट्रिटमेंट व्यवस्थित करता येत नाही आणि त्यामुळे भीतीपोटी रुग्ण प्रायवेट रुग्णालयात भर्ती होत आहे .

सरकारी व प्रायवेट रुग्णालयात औषधी दिल्या जात नसुन रुग्णालयात आॅक्सीजन सुद्धा मिळत नाही , इंनजक्शन मिळत नाही , औषधींचा काळा बाजार करण्यात आला आहे . कोरोना चा महामारीत मृत्युमुखी पडलेल्या मृतकाला हार्टअटैक नी मरण पावल्याचे दाखले डाॅक्टर्स देत आहे . काही दिवसान पुर्वी औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात एका जिवंत रुग्णाला मृत्यु घोषित करुन त्याला जाळण्यात आले . महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव एवढा वाढला कि कोणता व्यक्ति कधी मरेल हे सांगता येत नसुन जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन या कोरोना महामारी च्या या अंधाधुंदी व अकुशल गैरव्यवस्थापना करिता संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई चे डॉक्टर त्याताराव लहाने व सचिव , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई चे डॉक्टर सौरभ विजय हे दोन अधिकारी जिम्मेदार असुन कोरोना महामारीत भष्ट्र मार्गाने पैसे कमविण्याकरिता या दोघांनी आपल्या पदाचा दुरपयोग करुन सक्षम , कार्यक्षम , व कुशल डाॅक्टरांचा बदल्या करुन व त्यांना प्रतिनियुक्ती वर पाठविने सुरु केले असुन भष्ट्र डाॅक्टर व प्राध्यपकांकडुन पैसे घेवुन अश्या भष्ट्र डाॅक्टर व प्राध्यपकांना महत्वाच्या पदावर नियुक्ति केल्या जात होत्या . त्यामुळे मुंबई च्या मा. मॅट कोर्टाने डाॅक्टर अशोक रामचंद्र आनंद यांचा मुळ अर्ज क्रमांक ५०५/२०२० मध्ये दिनांक ०९ जानेवारी २०२१ रोजी आदेश पारित करुन न्यायनिर्णय दिला की कोरोना माहामारीत महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेज च्या डाॅक्टरांच्या प्रतिनियुक्ति वर किंवा अन्य मार्गाने बदली करण्याचे अधिकार डाॅक्टर त्याताराव लहाने यांना नाहीत . कोरोना चा वाढता प्रादुर्भाव कसा कमी करावा या कडे डॉक्टर त्याताराव लहाने व सौरभ विजय या दोघांचे लक्ष नाही . तर कोरोना माहामारीत भष्ट्र मार्गाने जास्तीत जास्तीत जास्त पैसा कसा कमविण्यात येईल या कडे या दोन्ही डाॅक्टरांचे लक्ष लागले आहे आणि त्यानुसार हे दोन्ही डाॅक्टर आपली पदीय कामे सुद्धा पार पाडीत असुन अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तदर्थ व कार्यकारी डीन अवैध व भष्ट्र मार्गाने पैसे कमवुन या दोन्ही डाॅक्टरांना देत असुन या दोघांनीही असक्षम , अकुशल व अकार्यक्षम प्राध्यापकांकडुन लाखो रुपयांची लांच घेवुन त्यांना महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तदर्थ व कार्यकारी डीन बनविले आहे . तर काहींना महत्वाच्या जागेवर पदस्थापित केले आहे . एवढेच नव्हे तर सक्षम , कार्यक्षम , व कुशल प्राध्यापकांना व अधिकिर्यांना जातीय आधारे व व्यक्तिगत भावनेतुन प्रताडित करण्याचे कामे हे दोन्ही डाॅक्टर करीत असुन या दोघांच्या बेजवाबदार पणामुळे महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव इतर राज्यांन पेक्षा जास्त वाढला असुन हे दोन्ही अधिकारी बदल्याचे व जातीय राजकारण महाराष्ट्रात खेळत असल्यामुळे हे दोन्ही अधिकारी महाराष्ट्रात कोरोना चा प्रादुर्भाव कमी करु शकत नाही आहे .

त्यामुळे अश्या भष्ट्र संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई चे डॉक्टर त्याताराव लहाने व सचिव , वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई चे डॉक्टर सौरभ विजय यांचा वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी व या दोन्ही अधिकार्यांना पदावरुन हटवुन चांगल्यात चांगल्या अधिकार्यांची नियुक्ती करुन महाराष्ट्रात पसरलेल्या कोरोनाची साकळी तोडण्याकरिता त्वरीत उपाय योजना करुन व सरकारी रुग्णालयात व प्राॅयवेट रुग्णालयात डाॅक्टर्स , नर्स , बेड्स आॅक्सीजन ची व्यवस्था करुन महाराष्ट्राला लवकरात लवकर कोरोनातुन मुक्ती करावे . अशी मागणी शिवसेने चे माजी तालुका प्रमुख महेंन्द्र भुरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री भगत सिंह कोश्यारी साहेबांना , मा.श्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना ,मा.श्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना , व मा.श्री अमित देशमुख साहेबांना ई.मेल आईडी द्वारे पत्र पाठवुन करण्यात आली आहे .

Check Also

*भारी मतो से जीते डॉ. आशिषराव देशमुख* *जीत होतेही घर जाकर लिया अपने पिताश्री रणजीतबाबू देशमुख के पैर छूकर और गले लगाकर आशीर्वाद*

🔊 Listen to this *भारी मतो से जीते डॉ. आशिषराव देशमुख* *जीत होतेही घर जाकर …

14:39