* वेगळा विदर्भ शिवाय पर्याय नाही – डॉ.श्रीनिवास खांडेवाले*
प्रतिनिधी -दिलीप घोरमारे (सावनेर )
कलमेश्वर -” वेगळा विदर्भ शिवाय पर्याय नाही ”
विदर्भात सर्व दृष्टीकोणातून सुजलम-सुफलम पहायचे असते तर वेगळा विदर्भा शिवाय पर्याय नसल्याचे मत अर्थातज्ञ व विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष डॉ.श्रीनिवास खांडेवाले यांनी दि.22 सप्टेंबर ला आयोजित शेतकरी मेळाव्यात केले..
शेतकरी संघटनेच्या वतीने दि.22 सप्टेंबर ला ब्राम्हणी येथील आशीर्वाद सभागृहात शेतकरी, वीज,विदर्भ-युवक मेळावा व जेष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता….या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी डॉ. श्री निवास खांदेवाले होते;प्रमुख मार्गदर्शक पाहुणे मुख्य संयोजक राम नेवले शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण केदार,रंजनाताई मामरडे,महिला आघाडी अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी दिलीप घोरमारे, विनायक खोरगडे,सुनिल वडस्कर,रवी हरकर,नंदू बेगड,संजय टेंभेकर,अरुण भोसले,नंदू ठाकूर, रविना शामकुळे,मुकेश मसूरकर,मुरलीधर ठाकरे,गँगाधर मोहत्कर,अण्णाजी राजेधर,रामदास राऊत,नरेश वानखेडे,बन्सीधर कोठीकर,माया निनावत व अन्य मान्यवर उपस्थित होते…यावेळी अरुण केदार म्हणाले की शेतकऱ्यांचा शेतमालाला स्स्त भाव शेतकरी शेतमजुरांना पेन्शन,बेरोजगाराना रोजगार, विजेचे दर निम्मे करण्यासाठी व शेतकऱ्यांचा इतर समस्यांसाठी वेगळा विदर्भ एकमेव उपाय असल्याचे विचार व्यक्त केले…कार्यक्रम मध्ये राम नेवले यांनीही मार्गदर्शन केले व सावनेर एकमेव विधानसभा मतदार संघातुन शेतकरी संघटनेच्या वतीने अरुण केदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली कार्यक्रम मध्ये कळमेश्वर परिसरातील ज्येष्ठ नागरिक व पत्रकाराच्या सत्कार करण्यात आला…कार्यक्रमाचे संचलन संजय टेंभेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप घोरमारे यांनी मानले..कार्यक्रमां मध्ये कळमेश्वर परिसरातील व जिल्ह्यातील महिला, पुरुष,शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते*