*नागपुर ग्रामीण चे पोलीस अ़धिक्षक श्री राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हिड १९ विषयी केली जनजागृती*
*मास्क न लावणार्या , व विनाकारण फिरणार्या नागरिकांवर केली दंडात्मक कारवाई*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात स्व:ईच्छा कडक लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसी कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड चौकात नाकेबंदी दरम्यान नागपुर ग्रामीण चे पोलीस अधिक्षक मा.श्री राकेश ओला साहेबांनी भेट देऊन दुचाकी , चारचाकी वाहन चालकास व वयोवृध्द नागरिकांना थांबवुन कोव्हिड १९ संदर्भात माहिती देत व जनजागृती करित मास्क न लावणार्या व विनाकारण फिरणार्या लोकांवर कार्यवाही करण्यात आली.
सोमवार दिनांक.२६ एप्रिल ला कन्हान – कांन्द्री दुकानदार महासंघ, कन्हान – पिपरी नगरपरिषद प्रशासन व कन्हान पोलीस प्रशासना द्वारे लोकहितार्थ स्व:ईच्छा कन्हान ला कडक लॉकडाऊन च्या पहिल्या दिवसी तारसा रोड चौक कन्हान येथे नाकेबंदी सुरू असतांना नागपुर ग्रामिण चे पोलीस अ़धिक्षक मा.श्री राकेश ओला साहेबांनी भेट दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी, कार्यालय कन्हान मा.श्री मुख्तार बागवान, कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार मा.श्री सुजितकुमार क्षिरसागर, ईतर अधिकारी व अमलदार उपस्थित असतांना पोलीस अधिक्षक मा.श्री राकेश ओला साहेबांनी येणार्या व जाणार्या दुचाकी , चारचाकी वाहन धारकांना व वयोवृध्द व्यक्तींना थांबवुन कोव्हिड-१९ संबंधात माहिती दिली आणि वयोवृध्द व्यक्तींना घरा बाहेर न निघण्या बाबत सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच मास्क न लावणार्या व , विनाकारण फिरणार्या नागरिकांन दंडात्मक कारवाई करण्यात आली . या प्रसंगी कन्हान पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .