*मोवाड प्राथमिक आरोग्यला लसीकरण साठी लोकांना च्या सकारात्मक प्रतिसाद*
नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
नरखेड – नगर पालिका मोवाड क्षेत्रातील सर्व नागरिकांना ,दिनांक १ एप्रिल २०२१ पासून ४५ वय वर्षावरील सर्व नागरिकांकरिता कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.व अद्याप ही सुरू आहे.
दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजीपर्यँत नगरपालिका मोवाड क्षेत्रातील ४५ वयवर्ष पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांपैकी १८४३ नागरिकांनी(७१.९४%) कोविड प्रतिबंधात्मक लस घेऊन जबाबदार नागरिकाचे कर्तव्य बजावले आहे.
लस घेतल्यामुळे नगरपालिका मोवाड क्षेत्रातील कुठल्याही व्यक्तीस त्रास झाला असल्याची घटना घडलेली नाही.
लस ही सुरक्षित असून,लस घेतल्याने शरीरात कोरोना विषाणू संसर्गपासून लढण्याची प्रतिकारशक्ती तयार होत असून,त्यामुळे निश्चितच मृत्युदर आटोक्यात आणणे शक्य आहे.
याकरिता सहकार्य करणारे सर्व जबाबदार नागरिक, _नागरिकांना लसीकरणकरिता प्रोत्साहित करणारे_ सन्माननीय लोकप्रतिनिधी, _दररोज सतत 14 तास लसीकरण करणारे_ आरोग्य कर्मचारी आणि _स्वतः कोविड संसर्गाचा धोका पत्करून सर्वे करणारे_ नगरपालिका प्राचार्य,मुख्याध्यापक,
प्राध्यापक, शिक्षक
आजपर्यंत नगरपालिका मोवाड क्षेत्रातील 17 वॉर्ड पैकी 13 वॉर्ड मधील 60% पेक्षा अधिक पात्र नागरिकांनी लस घेतलेली असून,
वॉर्ड क्रमांक 10 च्या 95% पात्र नागरिकांनी लस घेतलेली आहे.
तसेच वॉर्ड क्रमांक 15,11,2,6 मधील 80% पेक्षा अधिक पात्र नागरिकांनी लस घेतलेली आहे.
तरी पण अजून ही ज्या ४५ वयवर्षं पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांनी लस घेतलेली नाही,त्यांनी तात्काळ स्वतःचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र मोवाड येथे करून घ्यावे.
सोबत स्वतःचे आधार कार्ड घेऊन जावे, नगरपालिका कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी आपल्यास सहकार्य करणेकरिता तेथे तत्परतेने हजर आहेत.
कृपया सर्वांनी सहकार्य करावे.
माझे मोवाड,माझी जबाबदारी
असे आवाहन मोवाड मुख्यधिकारी.पल्लवी राउत यांनी केले
मोवाड नगरपालिका प्रशासन
दिनांक-२४.४.२०२१
नगरपालिका मोवाड
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण टक्केवारी(वॉर्डनिहाय)
९५% पेक्षा अधिक लसीकरण झालेले वॉर्ड(एकूण-0)
निरंक
९०% ते ९५% पर्यंत लसीकरण झालेले वॉर्ड(एकूण-1)
वॉर्ड क्र 10(९४.६६%)
८०% ते ९०% पर्यंत लसीकरण झालेले वॉर्ड(एकूण-4)
वॉर्ड क्र 15(८९.२६%)
वॉर्ड क्र 11(८८.२७%)
वॉर्ड क्र 2(८४.८७%)
वॉर्ड क्र 6(८१.९४%)
७०% ते ८०% पर्यंत लसीकरण झालेले वॉर्ड(एकूण-5)
वॉर्ड क्र 16(७९.५३%)
वॉर्ड क्र 5(७५%)
वॉर्ड क्र 8(७३.९७%)
वॉर्ड क्र 12(७१.०४%)
वॉर्ड क्र 17(७०.२%)
६०% ते ७०% पर्यंत लसीकरण झालेले वॉर्ड(एकूण-3)
वॉर्ड क्र 9(६६.१३%)
वॉर्ड क्र 13(६५.६४%)
वॉर्ड क्र 4(६१.०८%)
५०% ते ६०% पर्यंत लसीकरण झालेले वॉर्ड(एकूण-3)
वॉर्ड क्र 3(५८.२३%)
वॉर्ड क्र 7(५६.६२%)
वॉर्ड क्र 1(५५.६१%)
५०% पेक्षा कमी लसीकरण झालेले वॉर्ड(एकूण-1)
वॉर्ड क्र 14(४४.७४%) अशा प्रकारे आता पर्यत लसीकरण झाले