गडचांदूर येथे अदामा इंडिया प्रा.लि.मार्फत शेतकरी चर्चा सत्र व मार्गदर्शन शिबिर.

गडचांदूर येथे अदामा इंडिया प्रा.लि.मार्फत शेतकरी चर्चा सत्र व मार्गदर्शन शिबिर.


प्रतिनिधि- संतोष मडावी

गडचांदूर येथे आज दिनांक 22सप्टेंबर रोजी 11वाजता बालाजी सभागृह येथे अदामा इंडिया प्रा.लि.कंपनीच्या वतीने शेतकरी चर्चा सत्र व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले .
या मार्गदर्शन शिबिराचे मार्गदर्शक म्हणुन अदामा कंपनीचे झोनल मॅनेजर श्री.श्रीधर रेड्डी सर रिजनल मॅनेजर विवेक नाखले सर तसेच मार्केटिंग मॅनेजर सुनिल लहाने सर उपस्थित होते या मार्गदर्शन शिबिरामध्ये शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नविन तंत्रज्ञाना विषयी माहिती दिली तसेच तणनाशके , कीटकनाशके व बुरशीनाशका विषयी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना शकेद , शमीर,कस्टोडीया,तकफ ,झोहर ,एजिल,बॅराझाइड या उत्पादना विषयी माहिती देण्यात आली.तसेच कीटकनाशके हाताळणे व फवारणी करतांना घ्यावयाची काळजी व सुरक्षा याबद्दल माहिती देण्यात आली,गुलाबी बोन्ड अळी च्या निरीक्षना साठी शेतकऱ्यांना फेरोमेन ट्रॅप चे वाटप करण्यात आले तसेच शिबिरामध्ये श्री. पुरषोत्तम पिंपळशेंडे रा.लखमापुूर,विजय धानोरकर,रा.चंदनवाही,अर्पित गावंडे रा.बाखर्डी,व मोहन पावडे रा.हिरापुर या उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या चर्चा सत्रामध्ये 300 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.या शिबिराचे आयोजन श्री नारायण एजन्सी,जगन्नाथबाबा कृषी केंद्र,व्यंकटसाई फर्टिलायझर ,व्यंकटेशवरा कृषी केन्द्र ,सुविधा कृषी केंद्र गडचांदूर ,नितीन कृषी केंद्र नांदाफाटा व चंद्रपुर येथील अदामा कंपनी चे टेरिटरी मॅनेजर श्याम तुळणकर व अदामा कंपनी कोरपना तालुका प्रतिनिधी समीर मांडवकर,भारत गौरकर व अब्दुल मलिक यांनी सहकार्य केले..

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …