*सरस्वती इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंती साजरी*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
कोराडी:- छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कला व वाणिज्य महाविद्यालय,सरस्वती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सरस्वती भवन कॉन्व्हेंट हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 112 वी जयंती अर्थात ग्रामजयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या संचालिका, प्राचार्या लता वाघ यांच्या हस्ते तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करण्यात आले व द्विप प्रज्वलित करण्यात आले. संस्थेचा संचालिका , प्राचार्या सौ लता वाघ यांनी कार्यक्रमाप्रसंगी उद्बोधित करतांना म्हणाल्या, बंधुभावाची शिकवण देणारे व धर्मनिरपेक्षतेने समाजाला स्वउन्नतीकरिता प्रबोधित करणारे तुकडोजी महाराज हे आधुनिक विचारांना भजनाच्या शैलीत समाजासमोर ठेवत होते. ग्रामविकास ते राष्ट्विकास असा व्यापक संदेश देत होते अश्या महामानवाच्या साहित्यातून आजही मानव प्रत्येक दिवसागणिक शिकत आहे असे सांगितले व प्रत्येकाने अशा महामानवाच्या कार्यकर्तृत्वातून सतत प्रेरणा घ्यावी .कार्यक्रमाला 10% शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रम covid-19च्या नियमानुसार पार पडला.