*केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी यांनी ग्रामीण रुग्णालय नरखेडला दिल्या ३ एन.आय.व्हि.(व्हेंटिलेटर) मशीन* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जंयतीला आकसिजन व्हेटिलेटर भेट*

*केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी यांनी ग्रामीण रुग्णालय नरखेडला दिल्या ३ एन.आय.व्हि.(व्हेंटिलेटर) मशीन*

*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जंयतीला आकसिजन व्हेटिलेटर भेट*

नरखेड तालुका प्रतिनिधि –  श्रीकांत मालधुरे

नरखेड – शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या ,ऑक्सिजनचा तुटवडा त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर नसल्याने येथील कोविड रूग्णनानां आपला जीव गमवावा लागत आहे या सर्व बाबींचा विचार करता नरखेड शहर भाजप तर्फे मनोज कोरडे महामंत्री नगर विकास आघाडी नागपूर जिल्हा ग्रामीण ‌व संजय कामडे अध्यक्ष नरखेड शहर भाजप यांनी सतत प्रयत्न करत माजी ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार साहेब, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये,काटोल न प सत्तापक्षनेते चरणसिंग ठाकुर,उकेश चाव्हान, भगवान गिरडकर, शामराव बारई यांनी केंदीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडे नरखेड शहाराकरिता व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली.


मा नितीन गडकरी साहेबांनी त्वरित दखल घेऊन 3 व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून दिल्या त्या मशीन नरखेड शहर भाजपच्या पदाधिका-यां हस्ते ग्रामीण रुग्णालय नरखेडचे वैद्यकीय अधीकारी डॉ हरिश महंत आणि डॉ. श्रुतीका बोरकर यांना देण्यात आल्या याप्रसंगी प्रमोद वैद्य, किशोरी कहाते, अशोक कळंबे,सुनील सोनटक्के, उमेश कळंबे, लिलाधर रेवतकर, रामचंद्र बागडे, रामदास बालपांडे,विजय खोपे उपस्थित होते.नरखेड शहर भाजपचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळींनी मा.नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार आणि माजी ऊर्जामंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे आभार मानले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …