*गरजु रुग्णांना मोफत भोजन*
*नवदुर्गा केटरिंग चे संचालक योगेश ठाकरे यांनी एका फोनवर भोजनाचा डब्बा गरजु रुग्णांन पर्यंत व रुग्णांच्या कुटुंबीयांन पर्यंत पोहचवुन देण्याची संकल्पना केली सुरु*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथील नवदुर्गा केटरिंगच्या संचालक योगेश ठाकरे यांनी गरजु रुग्णांना मोफत भोजन पोहोचविण्याचा विडा उचलला आहे .
नागपुर जिल्ह्यात , पारशिवनी तालुक्यात व कन्हान शहरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे शासकीय व प्राॅयवेट रुग्णालय देखील हाऊसफुल झाले असुन जिल्ह्या बाहेरील , जिल्ह्यातील व स्थानिक रुग्ण मोठ्या संख्येत दाखल होऊ लागल्याने रुग्णांच्या वेंटीलेटर बेड , आॅक्सीजन व औषधी च्या व्यवस्थे करिता नातेवाईकांना इकडे – तिकडे वणवण भटकाव लागत आहे . अश्या कुटुंबीयांन साठी कन्हान येथील नवदुर्गा केटरिंग चे संचालक योगेश ठाकरे यांनी एका फोनवर भोजनाचा डब्बा गरजु रुग्णांन पर्यंत व रुग्णांच्या कुटुंबीयांन पर्यंत पोहचवुन देण्याची संकल्पना सुरु केली असुन योगेश ठाकरे यांनी या जनहितार्थ कार्यासाठी आपला फोन क्रमांक सोशल मीडिया वर शेयर केला असुन बघता बघता अनेक कुटुंबीयांचे फोन भोजनाच्या डब्यांसाठी यायला सुरुवात झाली असुन योगेश ठाकरे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असुन गरजु कुटुंबीयांनी योगेश ठाकरे यांचे आभार मानले आहे .