*घरून गेलेल्या महिलेस कन्हान पोलीसांनी शो़धुन तिच्या मुलीच्या स्वाधिन केले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हनुमान नगर कन्हान येथील ४५ वर्षीय महिला घरून निघुन गेल्याची कन्हान पोलीस स्टेशन ला मिसींग दाखल असल्याने कन्हान पोलीसांनी तिला शोधुन तिच्या मुलीस सुखरूप स्वाधिन केले. प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक १७ एप्रिल २०२१ ला सकाळी ८ वाजता गं. भा. सुनिता बाळु चाबुस्कवार वय ४५ वर्ष राहणार हनुमान नगर कन्हान ही महिला कुणालाही न सांगता घरून निघुन गेल्याने तिचा परिसरात व नातेवाईकाकडे शोध घेतला असता मिळुन न आल्याने तिच्या मुलीने कन्हान पोलीस स्टेशन मध्ये रविवार दिनांक.१८ एप्रिल ला मिसींग दाखल केल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे पोहवा अरूणकुमार सहारे हयांनी तपास करून रविवार दिनांक २५ एप्रिल ला शोधुन कन्हान पोलीस स्टेशन येथे आणुन फिर्यादी मुलीला बोलावुन तिची आई सुखरूप स्वाधिन केली. ही कार्यवाई कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोहवा अरूणकुमार सहारे ब नं.३५६ व पोशि मंगेश सोनटक्के ब नं ९७८ हयांनी तपास केला.