*सिद्धांत कातकर ची राष्ट्रीय स्तरावर निवड*

*सिद्धांत कातकर ची राष्ट्रीय स्तरावर निवड*


*दिल्ली दूरदर्शन वर होणाऱ्या कार्यक्रमात सामील होणार*

 

आवारपुर प्रतिनिधि- गौतम धोटे

*आवारपूर :- चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालूका येथील रहिवाशी सिद्धांत कातकर ने प्राथमिक फेरी मध्ये गुणवत्ता प्राप्त केल्यामुळे त्याला प्रसार भारती ,दूरदर्शन केंद्र ,दिल्ली येथे होऊ घातलेल्या व अत्यंत म्हत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या .मोनिया ते महात्मा. या विषयावर थेट प्रसारण होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
सिद्धान्त कातकर राजुरा येथील डॉ. सत्यपाल कातकर ,मनोवैज्ञानिक ह्यांचा मुलगा आहे, उच्च शिक्षित व सदन परिवारातील असूनसुद्धा शिक्षण मात्र राजुरा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक शाळा ,न.प.राजुरा इथे मराठी माध्यमा मध्ये घेतले व प्रथम क्रमाकाने तो सतत उतीर्ण झाला आहे , पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण जि.प. हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज,राजुरा मध्ये झाले ,HSC ला तो कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाला आहे ,विशेष म्हणजे कुठल्याही खाजगी ट्युशनला तो कधीही गेला नाही तरीही गुणानुक्रमाने तो पास होत आला आहे,सध्या तो भारतातील नामवंत सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक,गुलबर्गा येथे इंटिग्रेटेड एम .टेक (पॉवर & एनरजी इंजिनिअरिंग) च्या चौथ्या वर्षाला शिकत असून तिथे सुद्धा तो मेरीट मध्ये उत्तीर्ण होत आहे.
प्राथमिक फेरी 22ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान MyGov द्वारा घेण्यात आली ह्या मध्ये समस्त देशातून लाखो विद्यापीठ छात्र सामील झाले होते ,ह्यात सिद्धांत हा गुणक्रमे मेरिट आल्यामुळे त्यांला ही संधी मिळाली, प्रसार भारती ,दूरदर्शन व महात्मा गांधी दर्शन भारत सरकारद्वारे ही प्रशमंजुषा स्पर्धा दि 26 सप्टेंबर ते 29 संप्टेंबर2019ला आयोजित दिल्ली दूरदर्शन स्टुडिओत चित्रण व रेकॉर्डिंग केले जाईल व थेट प्रसारण दि.26,27 सप्टेंबर 2019 व 28 ,29 सप्टेंबर ला केले जाईल, संपुर्ण खर्च भारत सरकार करीत आहे ,भारत देशातील गुणवंत 24 विद्यापीठ छात्राची देशात सहा झोन मधून ह्यात निवड करण्यात आली आहे , विमान प्रवास व दिल्ली मध्ये राहण्याची व्यवस्था गांधी दर्शन व दूरदर्शन केंद्र दिल्ली करीत आहेत अशा आशयाचे पत्र डेप्युटी डायरेक्टर प्रोग्राम एस .के .एस .त्रिपाठी दुरदर्शन केंद्र दिल्ली ह्याचे दि 11. 09 ,2019 चे पत्र प्राप्त झाले आहे.*मोनिया ते महात्मा * ह्या विषयावर ही स्पर्धा होणार आहे ,सिद्धान्तच्या ह्या राजुरा ते थेट दिल्ली भरारी मुळे राजुरा शहराचे राष्ट्रीय स्तरावर चमकले आहे,तो आपल्या यशाचे श्रेय आई वडील व त्याचे प्राध्यापक व शिक्षक ह्यांना देतो ,त्याच्या ह्या यशाबद्दल केंद्रीय विद्यापीठ कर्नाटकचे व्हाईस चान्सलर,रजिस्ट्रार, प्राध्यापक,जि प ज्युनियर कॉलेज चे शिक्षक तसेच शहरातील पत्रकार तथा जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …