*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आपल्या वेतनातून आंबेडकरी गायक कलावंतांना केली आर्थिक मदत* *४0 गायक कलावंतांना प्रत्येकी रूपये ५ हजार ची आर्थिक मदत*

*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आपल्या वेतनातून आंबेडकरी गायक कलावंतांना केली आर्थिक मदत*

*४0 गायक कलावंतांना प्रत्येकी रूपये ५ हजार ची आर्थिक मदत*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना – महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना प्रत्येकी रुपये 5 हजाराची आर्थिक मदत केली.ना रामदास आठवले यांचे 1 महिन्याचे वेतन 2 लाख रुपये असून त्यातून 40 गायक
कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची आर्थिक मदत ना. रामदास आठवले यांनी केली. यावेळी सौ सीमाताई आठवले याही उपस्थित होत्या.


कोरोनाचा कहर वाढत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील आंबेडकरी गायक कलावंतांना मागील वर्षांपासून कोणतेही कार्यक्रम मिळत नसल्याने त्यांचा रोजगार बुडाला आहे. कलावंतांची आर्थिक स्थिती हालाकीची झाली आहे. त्यांना सर्वांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली पाहिजे.आंबेडकरी कलावंत आणि तमाशा लोककलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे. माझ्या तर्फे आंबेडकरी कलावंतांना आज पहिल्या टप्प्यात 40 कलावंतांना प्रत्येकी 5 हजाराची मदत आज दिली असून लवकरच तमाशा कलावंतांना रिपाइं तर्फे मदत करण्यात येईल तसेच राज्यातील विभाग निहाय कलावंतांना आर्थिक मदत लवकर करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ना. रामदास आठवले यांनी आज म्हणाले.

आज बांद्रा पूर्व येथील संविधान निवासस्थानी आंबेडकरी गायक कलावंत अशोक निकाळजे; मैनाताई कोकाटे; वैशालिताई शिंदे; छायाताई मोरे; चंद्रकला गायकवाड ;मुकुंद ओव्हाळ ; गौरी जाधव यांना ना रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. अन्य कलावंतांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम पाठविण्यात येणार आहे.त्यात लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; प्रताप सिंह बोदडे; कडुबई खरात आदी 33 गायक कलावंतांचा समावेश आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …