*कन्हान शहरात विविध संघटन द्वारे ठिक ठिकाणी महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस थाटात साजरा* *अन्नदान सर्वात श्रेष्ठदान – कल्याणी सरोदे*

*कन्हान शहरात विविध संघटन द्वारे ठिक ठिकाणी महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस थाटात साजरा*

 

*अन्नदान सर्वात श्रेष्ठदान – कल्याणी सरोदे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे शासनाच्या नियमाचे पालन करुन तसेच मास्क , सेनिटाइजर व सोशल डिस्टेन्सं चे पालन करुन कन्हान शहरात विविध ठिक – ठिकाणी महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन ध्वजारोहण करून महाराष्ट्र व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला .

*सरकारी स्वस्त धान्य दुकान कन्हान*

कन्हान – महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य सरकारी स्वस्त धान्य (राशन) केंन्द्र कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समाज सेविका सुनिता मानकर यांनी महाराष्ट्र राज्याला संताची, क्रांतिकारक, समाज सुधारकांची मोठी परंपरा लाभली आहे असे संबोधित करून कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी शारदा दुध बावणे, लिला बर्वे, गिता सहारे, संगिता तिवाडे, गुलाब झाडे, प्रशांत बाजीराव मसार, देवा चतुर, स्वप्नील मानकर, नोहर देवांगण, मनोज तिवाडे, संजय खडसे, मिथुन कोठेकर, सातिश ढबाले, उज्वल येलमुले, क्रिश वानखेडे सह आदि नागरिक उपस्थित होते.

*सामाजिक कार्यकर्ता कन्हान शहर*

कन्हान : – कन्हान शहर सामाजिक कार्यकर्ता द्वारे गांधी चौक येथे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून थाटात साजरा करण्यात आला .
कन्हान शहरात व परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासनाच्या नियमाचे पालन करित मास्क, सोशल डिस्टेंन्सचे पालन करित गांधी चौक कन्हान येथे शनिवार दिनांक १ मई महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर यांचे हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी प्रदीप बावने व प्रशांत मसार यांनी महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य उपस्थित नागरिकांना संबोधित केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेस पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर, प्रदीप बावने, प्रशांत मसार, मुकेश गंगराज, प्रकाश कुर्वे, अक्षय फुले , शुभम मंदुरकर सह नागरिक उपस्थित होते.

*महाराष्ट्र दिन व कामगार दिवसा निमित्य वृध्दाश्रम येथे अन्न वाटप*

कन्हान : – कांन्द्री- कन्हान येथील सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट कल्याणी सरोदे द्वारे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य वृध्दाश्रम मनसर येथे भेट देऊन अन्नदान करून महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला.
राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे शासनाने नियमावली कडक करून लाॅकडाऊन लावण्यात आल्याने रामटेक तालुक्याचा मनसर येथील लाॅकडाऊन मुळे वृद्धाश्रमाची परिस्थीती बिकट झाल्याने तेथील नांगरिकांन वर उपाशी पोटी राहण्याची वेळ आली असता कल्याणी सरोदे हिने मनसर येथे वृद्धाश्रम मध्ये महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य भेट दिली असता तेथील नागरिकांना १०० किलो तांदुळ, ७० किलो गहु व तेलाचे डब्बे देऊन अन्नदान करण्यात आले . यावेळी कल्याणी सरोदे हिने नागरिकांना कोव्हिड-१९ विषयी माहिती देत संबधित विविध विचार व्यक्त केले. या सेवाभावी कार्यास महेंन्द्र भुरे यांनी कल्याणी सरोदे ला सहकार्य केले तर या उत्तम कार्याबद्दल कैलाश रामटेके यांनी कल्याणी सरोदे हिचे आभार मानले.

*सार्वजनिक वाचनालय , कन्हान*

कन्हान – सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे १मई महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कोरोना च्या पार्श्वभुमिवर शासनाच्या नियमाचे काठेकोरपणे पालन करुन कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंन्द्र गिरडकर आणि प्रमुख अतिथि दिनकरराव मस्के यांनी रविंद्रनाथ टागोर व सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्ग श्री विठ्ठलराव नाईक साहेब यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली असता सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . कार्यक्रमाची प्रास्ताविका मध्ये श्री श्याम बारई यांनी वाचनालय प्रगतिचा अहवाल व महाराष्ट्र राज्य निमिर्ति करिता शहिद झालेल्या १०६ वीर जवानांची आठवण करुन शहिदांना श्रद्धांजलि देऊन महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य माहिती देत अल्पोहार वितरित करुन कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्रकाशराव नाईक , कोषाध्यक्ष मनोहर कोल्हे , सदस्य अल्काबाई कोल्हे , सह आदि नागरिक उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्याम बारई यांनी केले तर आभार कृणाल कोल्हे यांनी मानले .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …