*आचार संहिता लागताच खुर्सापार सीमेवरील घटना -10 लाखाच्या चांदीच्या वस्तु जप्त*
*सावनेर तहसिल पथकाची तपासणी कारवाई*
*तहसिलदार दिपक करांडे यांच्या नेतृत्वात सदर कारवाई*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले (सावनेर)
सावनेर : मध्यप्रदेश इंदोर वरून महाराष्ट्रात नागपुरला जाणार्या चारचाकी मारोती वैन वर कारवाई करण्यात आली . नागपुरातील व्यापाऱ्यास विकण्या करीता चांदीच्या वस्तु घेऊन जाणाऱ्या मारुती कंपनीची कार एमपी ०९ डब्ल्यू . सी . ०१७१ महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमेवर खुर्सापार येथे विधानसभा निवडणुकी अंतर्गत आचारसंहिता सुरु झाल्याने तपासणी घेतली असता तपासणीत तपकिरी रंगाच्या २ बॅग व काळ्या रंगाची १ बॅग अश्या ३ बॅग मध्ये चांदीच्या वस्तु आढळुन आल्यात . एकुण जवळपास १० लाख रूपये किंमतीच्या ३२ किलो ९४० ग्राम चांदीच्या वस्तु जप्त करून शासकिय कोषागार येथे ताब्यात घेऊन सावनेर येथे ठेवण्यात आल्या आले .
सदर गाडी चालक चिराग सुशिल जैन वय ३० वर्ष व राजेश साहू वय ३४ वर्ष दोघेही रा. इंदोर यांना विचारपुस केली असता सदर चांदीचे वस्तु इंदोर वरुन नागपुरला विकण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. अंदाजे किम्मत १० लाखाच्या घरात असुन जप्ती केलेल्या वस्तुचे जीएसटी बिल व आयकर विभागा कडुन तपासुन पुढील कारवाही करण्यात येईल असे सावनेर चे तहसिलदार दिपक करांडे यांनी सांगितले.
या कारवाहीत तहसिलदार दिपक करांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असुन नायब तहसिलदार श्रीमती चैताली दराडे , सतिश मसाळ ,एस एस टी प्रमुख प्रतिक रमेश तडस, भैयाजी उईके ग्रामसेवक,विडिओ ग्राफर सौरभ साहु व जयसिंग राठोड ,पवार ,निशांत पोटवार व संपूर्ण टिम ने केली.