*एका महिन्यावर पावसाळा आणि कालच्या एका पावसात तळेगाव आर्वी रोड व आर्वी पुलगाव रोड ची स्थिती*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – फक्त खोदून ठेवल्याने नागरिकाना मोठ्या अडचणींना समोर जावं लागेल तीन तीन वर्षांपासून काम सुरु आहे अजून काम अर्धही झालं नाही येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागेल नागरिकांनी रस्त्यावर चालताना स्वतः ची व परिवाराची काळजी घ्यावी कारण प्रशासन.. आपली जबाबदारी एकदुसर्यावर ढकलण्यात धन्यता मानते.
आर्वीकरांना येत्या काळात या खोदून ठेवलेल्या खोदकामामुळे जीव गमावावा लागू नये आज एक गरीब सायकल चालक मागून रेती च खाली डम्पर आल्याने दचकला आणि अरुंद रस्त्यावरून रात्रीच्या आलेल्या पाण्यामुळे चिखलाने खोदलेल्या मोठ्या नालीत सायकल सह पडला सुदैवाने त्याला कोणतीच हानी झाली नाही त्याच नुकसान झालं नाही पण हिच घटना दुचाकी चालकासह झाली असती तर कदाचित भयंकर काहीतरी घडलं असत अजून एक महिना आहे संबंधित यंत्रणेने शहरातील व शहरा बाहेर केलेले खोदकामा पुढे जाऊन लवकरात लवकर काम करावे जेणेकरून कोणाचाही जीव जाणार नाही कारण एखाद्याचा जीव गेल्यानंतर आपल्या भावपुर्ण श्रद्धांजली दिल्याने त्या परिवाराचा आधार परत येत नाही आज गरज आहे उपाय योजना करायची तरी प्रशासनाने लक्ष देऊन सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे.