*सावनेर तालुक्यात मास्क वाटप*
*सामाजिक संस्था व्दारे प्राप्त 17 हजार मास्क वाटपाला सुरवात*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया
सावनेर – तालूक्यातील कोरोनाचा प्रभाव वाढत असून लसीकरणासाठी लोकांना जास्तीत प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
त्याकरीता लोकांनी कोवीड़ 19 च्या दिशानिर्देशाचे पालन करणे, मास्क चा वापर करावे,सोशल डिस्टंन्सीग याकरीता सर्व लसीकरण केंद्रावर लोकांना मोफत मास्कचे वाटप तहसील कार्यालय तसेच सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने करण्यात येत आहे.तसेच ज्या गावात कोरोना संक्रमीत जास्त रूग्ण आहेत तेथेही मोफत मास्क देण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दीली आहे.
या करीता तहसिलदार सतिश मासाळ यांनी सर्व सेवाभावी संस्था व काही उद्योगांना केलेल्या आवाहनानुसार मानव रूहानी मिशन यांनी १०००० मास्क, स्टेट बॅंक आॅफ इंडीया यांनी ३००० मास्क, इतर उद्योजक यांनी २०००, तसेच बँडमिंन्टन क्लब सावनेरचे कार्यकर्ते यांनी २००० मास्क दिले असून एकुण १७००० मास्कचे वाटप तालूक्यात करण्यात येत आहे.
*सामाजिक बाधिलकी म्हणून सावनेर बॅडमिंटन क्लब तर्फे 2000 मास्क वाटप*
कोरोना च्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण भारत देशामध्ये थैमान घातले असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात मृत्य संख्या सुद्धा वाढली आहे. याला आळा घालावा करिता राज्य शासनाने परत एकदा कडक लॉक डाऊन मागील एक महिन्या पासून लावले आहे. परंतु हे सर्व करून सुद्धा नागरिक मात्र बिना मास्क ने फिरत असल्याचे दिसून येत असल्याचे पाहून नगर पालिकेने बिना मास्क असलेल्यांना आर्थिक दंड सुध्दा आकारले जात आहे. परंतु सुधारणा होत नसल्याचे पाहून शासनाने व स्थानिक सावनेर बॅडमिंटन क्लब व समाज बांधवांना सोबत घेऊन विना मास्क असलेल्या ना मास्क वाटण्याचे कार्य आज पासून सुरू केले असून, आज स्थानिक गांधी चौक येथे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार सतीश मसाळ,पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सरंबळकर ,सावनेर पुलिस निरीक्षक मारुती मुळूक, नायब तहसीलदार गजानन जवादे, पो उपनिरीक्षक सतीश पाटील, हेका. बोरकर, क्लब चे सदस्य ऍड शैलेश जैन,अँड्. भोजराज सोनकुसरे,प्रकाश बालपांडे,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे, डॉ सचिन घटे, पत्रकार विजय पांडे,पियूष झिंजुवाडीया,तसेच तहसील व नगर परिषदेचे कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.