*टेकाडी येथे नागरिकांना मास्क वाटप करून केली जनजागृती*
*टेकाडी ग्रामपंचायत (कोयला खदान) सरपंचा व सदस्य यांचा उपक्रम*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – टेकाडी येथे कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत असल्यामुळे टेकाडी ग्रामपंचायत द्वारे शासनाच्या प्रतिबंधक सर्व नियमाचे पालन करून गावात फिरून नागरिकांना मास्क वाटप करित कोरोनाशी लढण्या विषयी जनजागृती करण्यात आली.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, टेकाडी गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या प्रतिबंधक नियमाचे पालन करून मास्क, सोशल डिस्टेसिंगचे पालन करित टेकाडी ग्राम पंचायत च्या सरपंचा सौ सुनिताताई मेश्राम यांनी सदस्या सोबत गावात फिरून नागरिकांना मास्क वाटप करित कोरोना आजाराशी लढण्या विषयी जानजागृती करण्यात आली.
तसेच गावातील नागरिकांनी कोरोना सारख्या घातक महामारी विषाणु पासुन वाचण्याकरिता मास्क, सेनिटाइजर, सोशल डिस्टेसिंगचे पालन करावे, विना कामाने घरा बाहेर पडु नये, गर्दी जाणे टाळावे या शासनाच्या प्रतिबंधात्मक नियमाचे काठेकोरपणे पालन करून आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घेत घरीच राहावे असे कडकडीचे आवाहन टेकाडी ग्राम पंचायत च्या सरपंचा सौ सुनिताताई मेश्राम यांनी नागरिकांना केले.