*झोलाछाप डाँक्टरांची गय केल्या जाणार नही – तहसीलदार सतिश मासाळ*
*पीपळा डाग बंगला येथील बोगस डॉ. योगीराज तितरे यांच्यावर कारवाई*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः संपूर्ण देश कोरोना माहामारीशी झुंज देत आहे.प्रशासकीय स्तरावरील सर्व उपाययोजना राबविण्यात संपूर्ण प्रशासन जिवाचे रान करत आहेत.वैद्यकीय अधिकारी तसेच खाजगी तज्ञ नागरिकांना योग्य उपचारासाठी धडपड करीत आहेत अश्यात मात्र संधिचे सोनं करणाऱ्यांची ही कमतरता नाही.असाच एक प्रकार सावनेर तालुक्यातील पीपळा डाग बंगला येथे उघडकीस आला असुन सदर झोलाछाप डाँक्टरवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असुन त्याच्या बोगस दवाखान्यास टाळे ठोकण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 04/05/2021 ला ग्रा.पं.पिपळा (डा.बं) येथील बोगस डॉ. योगीराज तितेर हे आपल्या खाजगी दवाखान्यात अनेक रुग्णांना उपचार देत असतांनाच तहसीलदार सतिश मासाळ, खंडविकास अधिकारी अनिल नागणे,तालुका आरोग्य अधिकारी वाघ सह इतर अधिनस्थ अधिकारी कर्मचारी यांनी सदर दवाखाण्याला भेट दिली असता त्यांना दवाखान्याचे रजिस्ट्रेशन व पदवी प्रमाणपत्र मागविले असता कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविले नाही. तसेच कोवीड बाबतीत ते दक्षता घेत नसून लक्षणे असणा-या रूग्णांची माहीती प्रशासनास देत नाहीत. तसेच वैद्यकीय वापर झालेल्या सलाईन, इंजेक्शन इत्यादि संसर्गजन्य कचरा रस्त्याच्या कडेला बेवारस पणे टाकलेला होता.त्यामुळे सदर दवाखाना सील करण्यात आला.
तसेच तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गानी ग्रा.पं. ला भेट देऊन वाढत्या कोरोना आजारावर आळा घालण्या करिता उपाय योजना करण्यात आल्या व लसिकरण वाढविण्या करीता मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावा गावात असलेल्या सर्व डाक्टर यांच्याकडे योग्य वैद्यकीय कागदपत्रे आहेत की नाही यावरही लक्ष देण्याच्या सुचना याप्रसंगी देण्यात आल्या.
सध्या परिस्थितीत कोरोनाची भीती व महागड्या औषधोपचार यामुळे गोरगरिबांना भूलथापा देऊन माया गोळा करण्याकरिता असे अनेक झोलाछाप डाँक्टरांनी आपले दवाखाने थाटात नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.यावर आळा घालण्यासाठी तहसीलदार सतिश मासाळ यांनी कंबर कसली असुन झोलाछाप डाँक्टरांना नागरिकांच्या जिवीतेशी खेळू देणार नाही चा निर्धार केला असुन तालुक्यातील असलेल्या अश्या दवाखान्यांची वरच्यावर पाहणी करुण त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर पीपळा डागबंगला येथील बोगस झोलाछाप डाँक्टर योगराज तितरे यांना दि.5 मे सकाळी दहा वाजतापर्यंत योग्य वैद्यकीय कागदपत्रे तसेच प्रमाणपत्र सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन त्यांनी सदर वेळत योग्य वैधानिक पुरावे सादर न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारण्यात येणार असल्याची माहिती दीली.तर तहसिलदारांनी केलेल्या अचानकच्या कारवाई मुळे झोलाछाप डाँक्टरांचे धाबे दणाणले असुन अधिकतर झोलाछाप डॉक्टर भुमीगत होण्याच्या तयारीत लागले असल्याचे वु्त्त आहे.