*आमदार डॉ देवराव होळी यांनी थेट जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड केअर सेंटर येथे भेट दिली*
*येथील नवनिर्मित अाक्सिजन प्लांट व्यवस्था चा घेतला आढावा*
गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गडचिरोली – येथील जिल्हा सामान्य रुग्णालय
येथे आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी थेट कोरोणा वार्ड येथील भरती रुग्णांची भेट घेतली व समस्या जाणून घेतली व येथे होत असलेल्या उपचारा बाबत सविस्तर माहिती घेतली यावेळी बोलतांना आमदार डॉ होळी यांनी सांगितले सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोणत्याही उपचाराची कमी पडू नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील समस्त डॉ,यांनी कार्य करावे व रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे या भावनेने काम करावे असे जाहीर आव्हान केले व जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने तयार होत असलेल्या आक्सिजन प्लांट व्यवस्था बद्दल सविस्तर माहिती घेतली व सदर अाक्सिजन प्लांट व्यवस्था तत्काळ सुरू करण्यात यावे असे निर्देश दिले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे पंचायत समिती सदस्य रामरतन गोहणे ,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रूढे ,डॉ बागराज धूर्वे ,डॉ माधुरी कीलनाके , स्नेहल संतोषवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
*सलग दुसऱ्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनमुक्त झालेल्यांची संख्या जास्त ; 627 कोरोनामुक्त*
17 मृत्यूसह 516 नवीन कोरोना बाधित
गडचिरोली आज जिल्हयात 516 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज *627 जणांनी कोरोनावर मात* केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 17 नवीन मृत्यूमध्ये 36 वर्षीय पुरुष रामकृष्णपूर ता.चामोर्शी, 51 वर्षीय पुरुष जोगीसाखरा ता.आरमोरी , 68 वर्षीय महिला गडचिरोली , 38 वर्षीय पुरुष ता.अहेरी, 58 वर्षीय पुरुष ता.ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर , 61 वर्षीय महिला अहेरी, 66 वर्षीय महिला वाघाडा बर्डी ता.आरमोरी, 40 वर्षीय पुरुष उमरी ता.चामोर्शी , 48 वर्षीय महिला गडचिरोली, 75 वर्षीय महिला नवेगाव गडचिरोली, 55 वर्षीय पुरुष विवेकानंद नगर गडचिरोली, 73 वर्षीय पुरुष सर्वोदय वार्ड गडचिरोली, 53 वर्षीय पुरुष आरमोरी, 75 वर्षीय पुरुष गडचिरोली,65 वर्षीय पुरुष वनश्री कॉलोनी नवेगाव गडचिरोली,65 वर्षीय पुरुष कुरुड ता.वडसा यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.
नवीन 516 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 177,* अहेरी तालुक्यातील 58, आरमोरी 30, भामरागड तालुक्यातील 7, चामोर्शी तालुक्यातील 42, धानोरा तालुक्यातील 26, एटापल्ली तालुक्यातील 36, कोरची तालुक्यातील 9, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 31, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 22, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 59 जणांचा समावेश आहे. तर *आज कोरोनामुक्त झालेल्या 627 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 222,* अहेरी 66, आरमोरी 45, भामरागड 18, चामोर्शी 61, धानोरा 04, एटापल्ली 26, मुलचेरा 10, सिरोंचा 26, कोरची 38, कुरखेडा 21, तसेच वडसा येथील 90 जणांचा समावेश आहे.