*पारशिवनी तालुक्यात ठिक ठिकाणी भाजपा पदाधिकार्यांनी केले पश्चिम बंगाल येथील हिंसाच्या विरोधात निषेध आंदोलन*
*पारशिवनी शहर व कन्हान – कांद्री शहरात भाजपा पदाधिकार्यांनी केले आंदोलन*
*राष्ट्रपती राजवट लागु करुन दोषियांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
पारशिवनी / कन्हान : – पश्चिम बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधली असुन भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना करतांना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली आहे. परंतु पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाला नंतर तिथे मोठा हिंसाचार भडकला असुन भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचं सत्र सुरु झालं आहे. या हिंसा चारातील बळींचा आकडा १५ चा वर पोहोचला असुन या हिंसाचारा विरोधात पारशिवनी तालुक्यात ठिक ठिकाणी भाजपा पारशिवनी तालुका , भाजपा युवा मोर्चा पारशिवनी व भाजपा कन्हान – कांन्द्री शहर पदाधिकार्यांनी पारशिवनी , कन्हान, व कांन्द्री येथे निदर्शने करून पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करीत दोषीयां वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिका-यांनी केंन्द्र सरकार ला केली आहे.
*कन्हान – कांन्द्री येथे पश्चिम बंगाल येथील हिंसाच्या विरोधात निषेध आंदोलन*
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील व सरचिटणीस चन्द्रशेखर बावनकुळे यांचा आदेशानुसार कोरोना काळातील शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून संपुर्ण महाराष्ट्रात पश्चिम बंगाल सरकार च्या विरोधात प्रत्येक बुथ प्रमुख केंन्द्रावर निषेध आंदोलनचे निर्देश देण्यात आल्याने कन्हान, कांन्द्री येथे भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर द्वारे तालुका अध्यक्ष अतुल हजारे व शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांचा नेतृत्वात पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात निदर्शने करून पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी आणि दोषीयांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिकार्यांनी केंन्द्र सरकार ला केली आहे. याप्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, महामंत्री अमिष रूंघे, तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, सौरभ पोटभरे, संकेत चकोले, लोकेश आंबाळकर, महामंत्री सुनिल लाडेकर , संजय रंगारी, नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे, अमन घोडेस्वार, स्वाती पाठक, अलदीराम कनोजीया सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
*भाजपा युवा मोर्चा पारशिवनी शहर*
पारशिवनी (कन्हान) : – पश्चिम बंगाल मध्ये निवडणु कीचे निकाल जाहिर झाल्यानंतर हिंसाचार भडकला असुन या हिंसाच्या विरोधात पारशिवनी भाजपा पदाधिकार्यांनी ऑटो स्टॅन्ड चौक पारशिवनी येथे ममता सरकार विरुद्ध निदर्शने करून पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लागु करून हिंसा भडकविणार्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिकार्यांनी केंन्द्र सरकार ला केली आहे .
पश्चिम बंगाल येथे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तृणमूल कांग्रेस च्या पदाधिकार्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरु केला असुन पश्चिम बंगाल येथे भाजपा पदाधिकार्यांचा खुन करण्यात येत असल्याने भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री चंन्द्रकांत दादा पाटील व सरचिटणीस मा. चंन्द्रशेखर बावनकुळे यांचा आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्रात पश्चिम बंगाल ला सुरु असलेल्या हिंसाच्या विरोधात जागो जागी निदर्शने करायचे ठरविले असुन पारशिवनी शहरात भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रतिक वैद्य यांचा नेतृत्वात कोरोना ची साकळी तोडण्याकरिता शासना द्वारे लावण्यात आलेल्या सर्व नियमाचे पालन करून ममता सरकार विरुद्ध निदर्शने करून पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती लावण्याची मागणी व हिंसा भडकविणार्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपा पदाधिकार्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातुन केंन्द्र सरकार ला केली आहे.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा पारशिवनी शहर अध्यक्ष प्रतिक वैद्य, भाजपा नेते अशोक कुथे, अर्शद शेख, राजु भोयर, मनोज गिरी, आशिष भुरसे सह आदि भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.