*सावनेर येथील लसीकरण केंन्द्रावर स्थानिकांना प्राधान्य द्या- मनोहर कुंभारे* *स्थानिकांना डावालून नागपुरकरांना लसीकरणाचा लाभ मिळत असल्याने संतप्तांचा लसीकरण केन्द्रावर राडा*

*सावनेर येथील लसीकरण केंन्द्रावर स्थानिकांना प्राधान्य द्या- मनोहर कुंभारे*

*स्थानिकांना डावालून नागपुरकरांना लसीकरणाचा लाभ मिळत असल्याने संतप्तांचा लसीकरण केन्द्रावर राडा*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि दिनेश चौरासिया

सावनेर : १८ ते ४५ वयोगटातील लसिकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आलेल्या सर्व नागपूरच्या नागरीकांचे सावनेरमध्ये लसिकरण करण्यात येत असल्याने नागपूर जि.प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वात सावनेर च्या लसिकरण केंद्रावर स्थानीकांचेच लसिकरण करण्यावर जोर देत गोंधळ घालण्यात आला . यामुळे सावनेरच्या भालेराव हायस्कुल येथे लसिकरणासाठी निर्माण झालेल्या गोंधळात राजकिय कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काही तास लसीकरण थांबवावे लागले.

राज्य सरकार द्वारे कोविड शिल्ड व कोवॅक्सीन अश्या दोन प्रकारच्या लसी कोरोनापासून बचावा करीता नागरीकांना लावण्यात येत आहे . कोविशिल्ड ही वॅक्सीन ( लस ) अमेरीकेच्या ऑक्सफोर्ड अॅक्राझेनका व भारताच्या सिरम इंस्टीटयुट ने मिळून भारतात बनविलेली आहे . तर को – वॅक्सीन ही भारतातील निर्मीती आहे . त्यामुळे को – वॅक्सीन ही आधी आली व कोविशिल्ड ही नंतर , दोन्ही कंपन्या दोन्ही वॅक्सीन चांगल्या असल्याचा दावा करीत आहे . परंतू भारतातील कोवॅक्सीन ही म्युटेंड वायरसलाही डिटेंड ( शोधत ) करीत असल्याचे तज्ञांचे मत आहे . सावनेर शहरातील विविध केंद्रात कोविशिल्ड ही लस लावण्यात येत असून शासनाने १८ वर्षा वरिल तरूणांना कोवॅक्सीन लसिकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा मार्ग काढला आहे .

*परंतू या ऑनलाईन नोंदणी मध्ये नागपूर जिल्हयात ४ केंद्र ठरविले असून यात सावनेर , काटोल , कन्हान , कामठी , अशी शहरे आहेत . त्यामुळे ज्यांना जे ठिकाण सोईचे आहे ते त्या ठिकाणाला पसंती दाखवून वॅक्सीनच्या पसंतीनुसार नोंदणी करीत आहे . यात सावनेरच्या युवकांची ऑनलाईन नोंदणी न झाल्याने व नागपूरच्या युवकांना ३०० ते ३०० लसीचे रजिस्ट्रेशन सावनेर केंद्र मिळाल्याने येथील नागरीकांनी लसिकरणासाठी कुठे जावे ? असा प्रश्न उपस्तिथ करीत नागपूर जि.प. चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सावनेर येथील भालेराव हायस्कुल च्या लसिकरण केंद्रावर पोहचून स्थानिकांना डावालून नागपुरकरांना सुरू असलेले लसिकरण थांबविण्यात आले.

यावेळी सावनेरचे उपविभागिय अधिकारी अतुल मेहेत्रे यांनी केंद्रावर धाव घेवून यासंमधी जिल्हाधिकाऱ्यांस माहिती देत अधिक वॅक्सीनचे केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले . यामुळे थांबलेले लसिकरण पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आले .


याप्रसंगी नागपुर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी स्थानिक नागरिकांना प्रथम लसीकरणाचा लाभ द्यावा,तसेच सदर क्षेत्र ग्रामीण असुन अनेकांना आँनलाईन पध्दतीने नोंदनी करता येत नसणार्यांना लसीकरण केन्द्रावर नोंदणी उपलब्ध करून देने.तसेच तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केन्द्रावर लसीकरण केन्द्र वाढवीने.तसेच बाहेरच्या नागरिकांना सावनेर येथील लसीकरण केन्द्रावर बाहेरील नागरिकांना लाभ देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली.

*याप्रसंगी सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसींग सावजी,नगरसेवक निलेश पटे,सुनील चाफेकर, युवक काँग्रेसचे सावनेर कळमेश्वर अध्यक्ष राजेश खंगारे, युवानेते व व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …