*वन्यजीव प्राण्यांच्या रक्षणासाठी उपाययोजना करा* *सर्पमित्रांच्या मागण्यांकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष ; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन* *राज्यातील सर्पमित्रांचा कामबंद ईशारा*

*वन्यजीव प्राण्यांच्या रक्षणासाठी उपाययोजना करा*

*सर्पमित्रांच्या मागण्यांकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष ; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन*

*राज्यातील सर्पमित्रांचा कामबंद ईशारा*

खापरखेडा प्रतिनिधी
नागपुर – वन्यजीव प्राण्यांच्या रक्षणासाठी राज्यात जवळपास ५ ते १० हजार सर्पमित्र कार्यरत आहेत लोकवस्तीत नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाने कोणत्याही उपाययोजना आखल्या नाहीत शिवाय त्यांच्याकडे मनुष्य बळ नाहीत यासंदर्भात सर्पमित्रांना संरक्षण देऊन उपाययोजना करण्यासंदर्भात शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला मात्र सर्पमित्रांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले त्यामूळे राज्यात कार्यरत सर्पमित्रांनी कामबंद पुकारले आहे नुकतेच यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.


वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार वन्यजीव प्राण्यांना बंदीस्त व पकडून ठेवणे कायद्याने गंभीर अपराध आहे मात्र निसर्गातील अंत्यत उपयोगी असलेल्या सापांच्या रक्षणासाठी कायद्या बाहेर जाऊन काम करावे लागत आहे सर्पमित्र सोडले तर अनेकांकडे सापांबद्दल योग्य माहिती नाही त्यामूळे साप पकडने त्यांच्या जिवावर बेतले आहे दिवसभरात राज्यात किती साप पकडले, कोण्ही पकडले, कुठे पकडले, पकडलेले साप व्यवस्थित जंगलात सोडले किंवा नाही याची नोंद वनविभागाच्या दप्तरी नाही त्यामूळे साप बंदिस्त करून ठेवणे, दुर्मिळ सापांची तस्करी करने, सापांचे खेळ दाखविणे यासारख्या घटना दिवसेंदिवस वाढीला आल्या आहेत शिवाय सर्पमित्र असल्याचे सांगून गरजे पेक्षा जास्त पैसे उकळण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

त्यामूळे सर्पमित्रांची वनविभाग कार्यालयात त्यांची नोंद करने अपेक्षित आहे शिवाय सर्पमित्रांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात यावे,सर्पमित्रांना ओळखपत्र, गणवेश व सेफ्टीकिट देण्यात यावे, मृत सर्पमित्रांना शासनाने सोयी सवलती द्याव्यात अश्या अनेक मागण्या सर्पमित्रांनी राज्य शासनाला दिलेल्या निवेदनातून केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास कामबंद करण्याचा ईशारा दिला आहे.

नुकतेच खापा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी सर्पमित्र दद्दू गणवीर, मयूर कनोजे, विक्की गजभिये, धीरज जगणे, अभिषेक नखाते आदि सर्पमित्र उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …