*मा. नितीनजी गडकरी यांच्या कडून प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद,बडेगाव येथे कोरोना रुग्नासाठी ऑक्सिजन मशीनचा पुरवठा*

*मा. नितीनजी गडकरी यांच्या कडून प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद,बडेगाव येथे कोरोना रुग्नासाठी ऑक्सिजन मशीनचा पुरवठा*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
केळवद/बडेगाव – दि.५ मे 2021 रोजी दोन्ही आरोग्य केंद्रावर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मशीन (ऑक्सिजन काँसंट्रेटर)आल्या असून आमदार मा. गिरीशजी व्यास यांच्या हस्ते दोन्ही केंद्रावर संबंधित अधिकाऱयांना या मशीन सोपविण्यात आल्या.
कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागात प्राणवायूसाठी(ऑक्सिजन) लोकांना दरदर भटकाव लागत असून अनेक गरीब रुग्ण शहरामध्ये जाऊ शकत नाही,तसेच शहरात बेड उपलब्ध नसल्याकारणाने अनेक लोकांना अडचणी येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब आमदार मा. गिरीशजी व्यास व मा.राजीवजी पोतदार यांच्या नजरेस आणून दिली. भाजपा च्या नेते मंडळींनी मा. नितीनजी गडकरी यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी लगेच ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या मशीन भाजपा च्या नेत्यांना सोपवून दिल्या आणी ऑक्सिजन मुळे कोणाचा जीव जायला नको अजून जे काही पाहिजे असेल ते मला सांगा आणी या कठीण काळात लोकांना मदत करा असे फर्मान सोडले.


संबंधीत मशीनमध्ये हवेद्वारे ऑक्सिजन जमा होते त्यामुळे वारंवार सिलेंडर भरून आणण्याची गरज नाही आणि तशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तरतूदही नसते त्यामुळे या मशीन एक वेळा आणली की नंतर तिला कुठलाही खर्च सुद्धा करण्याची गरज नाही. ग्रामीण जनतेला काही प्रमाणात का होईना या मशीनचा फार उपयोग होणार आहे. त्यामुळे आज आरोग्य केंद्रावर शेकडो नागरिक जमले होते. प्रत्येकामध्ये मशीन पाहण्याची इच्छा होती या मशीनला बघितल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.. प्रत्येक पाहणाऱ्याच्या तोंडातून मा. नितीनजी गडकरी यांच्या बद्धल आभाराचे शब्द निघत होते.


आमदार मा. गिरीशजी व्यास यांच्या हस्ते केळवद/बडेगाव येथे मशीन समर्पण कार्यक्रम पार पडला..
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱयांना लागणारी PPE किट व मास्क नगरसेवक श्री तुषारजी उमाटे व श्री लालाभाऊ गांधी केळवद यांचेकडून देण्यात आले.
कार्यक्रमात सर्वश्री मा. विजयबाबू देशमुख, मा. देवीदासजी मदनकर,मा. तीलकजी कमाले, मा. आशिषजी माटे, मा. सुधीरभाऊ चौधरी,मा. तुषारजी उमाटे, मा. बंडुभाऊ दुधे, मा. दिनेशजी मांडवकर, मा. लालाभाऊ गांधी, मा. विनोदजी बागडे, मा. नरेंद्रजी ठाकूर, मा. अभिषेकजी गहरवार,मा. आनंदजी श्रीवास्तव, मा. मानिषजी चित्तेवान ,केळवद च्या सरपंचा सौ. गीतांजली वानखडे, बडेगाव च्या सरपंचा सौ कराळेबाई मा. आत्मारामजी जामभुलकर, मा. अंकुशराव देशमुख सौ. बागडेताई,मा. मंगेशजी उराडे,मा. खंडाळ गुरुजी,मा. दिगंबर सुरतकर,मा. मिलिंद गिरटकर,मा. राजु काळे,,मा. जानरावजी खोंडे, मा.अशोकजी सोनेकर, सौ. माधुरिताई नगराळे, मा. मानिषजी गव्हाणकर,मा. अश्विनजी घाटोळे,मा. मनोज तळेकर व अनेक गावातील मंडळी हजर होती.
वरील तसेच परिसरातील सर्व गावकऱयांनी मा. नितीनजी गडकरी साहेब, मा.गिरीशजी व्यास साहेब, मा. डॉ. राजीवजी पोतदार साहेबांचे मनापासून आभार मानले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …