*बोरडा सराखा येथे कोविड -19 लसीकरण शिबिर संपन्न ; अनेक लोकांनी केले लसीकरण*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – दि.06/05/2021 ला गट ग्राम पंचायत कार्यालय बोरडा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र,बोरडा येथे कोविड-19 विषयी लसीकरण शिबिर घेण्यात आले होते.त्याच्या अगोदरच्या दिवशी गट ग्राम पंचायत बोरडा कडून सराखा,सत्रापुर,बोरडा तसेच देवळी या गावात दवंडीद्वारे व रॅली काढून जनजागृती करण्यात आली.या केलेल्या जनजागृतीमुळे अनेक लोकांनी या लसीकरण शिबीर कार्यक्रमात उत्स्फूर्त पध्दतीने भाग घेतला.
तसेच बाकीच्यांनी देखील लसीकरण करून घ्यावे व स्वतःचे आणि स्वतःच्या परिवाराचे संरक्षण करावे.अशा काही सूचना ग्राम पंचायत कार्यालयातर्फे गावकऱ्यांना देण्यात आल्या.यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच श्री.जगदीश अडमाची,ग्रामविकास अधिकारी श्री.फुके साहेब,आरोग्य सेविका सौ.डी.के.निंबाडकर मॅडम,आरोग्य सेवक श्री.टोंगसे साहेब,श्री.देवेंद्र राऊत (पोलीस पाटील,बोरडा),सौ.सुनीता नारनवरे (ग्रा.पं.सदस्य) तसेच सौ.मालती गजबे आदी उपस्तीत होते..