*राष्ट्रीय महामार्ग रस्ता बांधकामात दिरंगाई तळेगाव -ते -आर्वी रस्ता तातडीने पूर्ण करा*

*राष्ट्रीय महामार्ग रस्ता बांधकामात दिरंगाई तळेगाव -ते -आर्वी रस्ता तातडीने पूर्ण करा*

तळेगाव – आर्वी.नियमानुसार 1 वर्षात काम करण्याची कंडिशन असताना 20%सुद्धा काम पूर्ण झालं नाही यंत्रणा मात्र झोपीत
तीन -तीन कि मी च पूर्ण खोदकाम ते फायनल काँक्रीट काम करण्याचा नियम असताना आर्वी -ते -तळेगाव रस्त्यावर 1 कि मी ही कम्प्लिट काम झालंच नाही.

p

फक्त खोदकाम दाखवून मातीकाम वर होणारा 11.53 % लाटण्यासाठी आटापिटा सुरु काम करणाऱ्या कंपनी ला अधिकाऱ्याची साथ
युवा स्वाभिमान चे दिलीप पोटफोडे यांचा आष्टी तहसीलदार यांना इशारा काम पूर्ण करण्याच्या सूचना करा, आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण
पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला नागरिकांच्या जीवाशी खेळ बंद करा अन्यथा आंदोलन
मागील दोन वर्षा पासून तडेगाव-ते -आर्वी रस्त्याचे बांधकाम अतिशय धिम्मया गतीने सुरु असून रस्त्याने येणार जाणार नागरिक दोन वर्षा पासून प्रचंड त्रास सहन करत आहे आता दोन दिवसा अगोदर झालेल्या पावसात रस्ता चिखलमय झाला आणि रस्त्यावर अनेक जागी अपघात झालेत कुठे नागरिक किरकोळ जखमी झालेत तर कुठे गंभीर दुखापत झाल्याचे पाहावयास मिळाले दोन दिवसाच्या तूरडक पावसानी रस्त्याची अशी दयनीय स्थिती निर्माण झाली आहे तर एक महिन्यांनी परिस्थिती कशी राहिल आणि जर आर्वी किंवा आष्टी कारंजा तालुक्यातील किंवा कोणत्याही नागरिकांच्या जीवितास हानी झाली तर याच जबाबदार कोण राहील याचा जाब विचारण्यासाठी आज युवा स्वाभिमान पार्टी चे शिस्टमंडळ आष्टी ला धडकले परंतु आष्टी तहसीलदार वानखेडे हे न्यायालयीन कामाकरिता नागपूर ला गेले होते करिता प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार कांबळे यानी निवेदन स्वीकारले चर्चेत प्रामुख्याने निदर्शनास आणून दिले कि आपण या रस्त्याच्या कामात गांभीर्याने लक्ष दिले तर लक्षात येईल कि तळेगाव आर्वी रस्ता याच जास्तीत जास्त खोदकाम झालेलं आहे या पूर्ण अंदाजित बारा कि मी च्या रस्ता कामात कुठेही खोदकाम ते फायनल काँक्रीट कामपर्यंत काम झालेलं नाही जेंव्हा कि निविदेत स्पष्ट निविदा पृष्ठ क्र 136 वर 9.7 पॅरा वर नमूद आहे कि राष्ट्रीय महामार्ग नियमानुसार तीन -तीन कि. मी चे काम कम्प्लिट करावं लागेल तेंव्हाच दुसर तीन कि मी च्या कामाला हात लावावा जेणेकरून नागरिकांना आवगमन करायला काही अडचण होणार नही परंतु नियमांना तिलांजली देत सर्रास जागोजागी खोदकाम करून ठेवलं आणि त्यात प्रथम दर्शनी खोदकाम मातीकाम वर होणारा 11.53 टक्के होणारा खर्च परस्पर काम पूर्ण न करता अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन काढून मग जनता राम भरोसे जेंव्हा कि असं करण हे नियमांना पायदळी तुडवणे आहे परंतु कुंपण च शेत खायला निघाला त्याला वाली कोण अशी स्थिती तडेगाव आर्वी रस्त्याची होण्याची शक्यता आहे आणि जबाबदार अधिकारी दूरध्वनी उचलायला तय्यार नाही उलट मूल्यांकन देयक काढण्यासाठी हात पाय हलवत असल्याची चर्चा विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या कंडिशन वर सांगितले जे नियमाविरुद्ध आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …