*कन्हान-गहुहिवरा रोड वर जिवघेणा गड्डे पडल्याने अपघातास निमत्रंण*
*नागरिक त्रस्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहर अंतर्गत गहुहिवरा-चाचेर रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला सामोर दहाचाकी व त्यावरील जड वाहतुकीने रस्त्यावर मोठा जिवघेणा गड्डा होऊन चालकांना एकाएक गड्डा दिसुन अडथळा निर्माण होत अपघाताला निमत्रंण देत असल्याने त्वरित दुरूस्ती करून वाहतुक सुरळीत करण्यात यावी.
कन्हान तारसा रोड वरील रेल्वे क्रॉसींग वर उडाण पुलाचे निर्माण कार्य सुरू असल्याने या रस्त्यावरील जड वाहतुक बंद करून ती गहुहिवरा रस्त्याने वळविल्याने जड वाहतुकीची वर्दळ गहुहिवरा रस्त्याने वाढुन काही महिन्यापुर्वी डाबरीकरण करण्यात आलेल्या कन्हान- गहुहिवरा- चाचेर कडे जाणार्या गहुहिवरा रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला अगोदर काही अंतरावर मोठा गड्डा झाला आहे. हा गड्डा एकाएक दिसुन वाहन चालकांची चांगलीच फजिती होऊन अपघाताला निमत्रंण देत आहे.
रात्रीच्या वेळी अंधार असल्याने वाहनचालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन किंवा गड्डा वाचविण्याकरिता वाहन उजवी कडुन वाहन काढतांना सामोरून येणार्या वाहनाची धडक होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. यास्तव संबधित रस्ता प्राधिकरण विभागाने रस्त्यावर पडलेल्या गड्डयाची चौकसी व शहानिशा करून त्वरित उपाय योजना करण्यात यावी. जेणे करून अपघाताला आळा घालता येऊन निर्दोष लोकांना वाचविता येईल.