*लॉज मध्ये पिडीत महिलेला पैश्याचे प्रलोभन देऊन देहव्यापार करणार्या आरोपी ला कन्हान पोलीसांनी पकडले*
*कन्हान पोलीसांनी रेनबो लाॅजिंग अॅंन्ड बोर्डिंग लॉज वर धाड टाकुन केली कारवाई*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारातील एन एच ४४ महामार्गा वरील स्पाॅट ऑन रेनबो लॉजिंग अँण्ड बोर्डींग मध्ये पिडीत महिलेस पैश्याचे आमिष देऊन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करणार्या आरोपीला कन्हान पोलीसांनी पकडुन त्याचा जवळुन एकुण १३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ही कारवाई करण्यात आली.
कन्हान पोलीसांन कडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.५ मे ला सायंकाळी ०३.४० ते ०५.०५ वाजता च्या सुमारास आरोपी मंगेश मारोती बोरघरे वय २७ वर्ष राहणार. टेकाडी तालुका पारशिवनी हा नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील टेकाडी शिवारातील स्पाॅट ऑन रेनबो लॉजिंग अँण्ड बोर्डींग मध्ये पिडीत महिलेला पैश्याचे आमिष देऊन देहव्यापार करण्यास प्रवृत्त करून रेनबो लॉजिंग अँण्ड बोर्डींग मध्ये रूम नंबर १०३ उपलब्ध करून ग्राहकाकडुन पैसे घेऊन पिडीतेला आर्थिक प्रलोभन देऊन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याचे मिळुन आल्याने फिर्यादी कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस शिपाई विशाल शंभरकर यांचे लेखी रिपोटवरून अपराध क्रमांक १२४/ २१ कलम ४, ५ अनैतिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून ५०० रूपयां च्या ६ नोटा तीन हजार रू. ओपो कंपनी चा दोन सिम सह मोबाईल किंमत दहा हजार रूपए. हॉटेल मधिल यात्री खतावणी रजिस्टर, मिथुन कंपनीचे कंडोम असा एकुण १३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस सुचना पत्रावर सोडुन तपासात घेतला आहे.
सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक मा.श्री राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक राहुल माखणीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी मुखत्तार बागवाण यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक कन्हान थानेदार सुजितकुमार क्षीरसागर , एपीआई सतिश मेश्राम, नापोशि कुणाल पारधी, राहुल रंगारी, पोशि शरद गिते, संजय बरोदिया, विशाल शंभरकर, मुकेश वाघाडे, मंगेश सोनटक्के, चालक नापोशि संदीप गेडाम, मपोशि आदीने शिताफितीने धाड मारून कारवाई करून आरोपीस पकडले.