*आशुतोष मंडपे पीएचडी पदवीने सन्मानित*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान येथील श्री.आशुतोष मंडपे यांना अकॅडेमी ऑफ सायंटिफीक अँड ईन्नोव्हेटीव रिसर्च (ए.सी.एस. आय.आर) कडून इंजीनियरिंग मध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी) ची पदवी प्रदान करण्यात आली आहे.
बळीरामजी दखने हायस्कुल कांन्द्री – कन्हान चे माजी मुख्याध्यापक श्री एस.जी. मंडपे आणि श्रीमती माला मंडपे यांचे पुत्र श्री.आशुतोष मंडपे यांना अकॅडेमी ऑफ सायंटिफीक अँन्ड ईन्नोव्हेटीव रिसर्च (ए.सी.एस.आय.आर) कडुन इंजीनियरिंग मध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी) ची पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी डॉ सुनील कुमार यांच्या पर्यवेक्षणात सस्टने बल युटीलाईझेशन ऑफ फ्लाय एश इन इन-वेसेल कोमपोस्टिंग ऑफ अँग्रिकल्चरल वेस्ट ” या विषयावर सी.एस.आय.आर. नीरी नागपुर येथे संशोधन केले. त्यांना सीएसआयआर – नीरी नागपूर येथे सन २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट तरुण संशोधक या पुरस्काराने ही गौरविण्यात आले होते. या उपलब्धी साठी प्रा. प्रकाश पोहेकर आणि डॉ प्रदीप आगलावे यांनी त्यांचे अभिनंदन केले.