*वडीलांच्या चितेला मुलीकडून अग्निसंस्कार-*

*वडीलांच्या चितेला मुलीकडून अग्निसंस्कार-*


*रुढी़ परंपरे नुसार मुलालाच अंतीम संस्कार अथवा मुखाग्नी देण्याचे कर्तव्य पार पाडावे लागतात परंतु सावनेर येथील एकुलत्या मुलीने पार पाडले मुलाचे कर्तव्य*

*मुख्य संपादक किशोर ढुढेले*

*हिंदू समाज हा साधारणपणे रुढी प्रिय समजला जातो.वर्षानुवर्षे एखाद्या रुढीला,त्यातला अर्थ समजून न घेता, कवटाळून बसणारा,त्या वेगळं कुणी वागलं तर त्यावर टीका करणारा हा समाज अशी टीका ,स्वत:ला समाज सुधारक म्हणवणारे करीत असतात.पण अशा रुढी ज्या कालबाह्य झालेल्या आहेत त्यांना विरोध करुन त्या जात नसतात ;तर हळूवारपणे बाजूला करत समोर निघून जाणे हाच, अशा रुढींना कालबाह्य करण्याचा उपाय आहे.*
*सावनेर (जि.नागपुर) येथील लोकप्रिय आणि समाजात मिसळून काम करणारे, निवृत्त शिक्षक श्री.गणपती काशिराम जी उपाध्याय यांचे दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले.त्यांना एकच मुलगी, पूजा !ती अमेरिकेत पिटस् बर्ग येथे नोकरी करते .*


*उपाध्याय सर, ज्योती भाभी आणि स्वत: पूजा अत्यंत धार्मिक वळणाचे.पूजा हिंदूत्वनिष्ठ.तिघांनाही हिंदूत्वाचा सार्थ अभिमान.उपाध्याय परिवार आणि ज्योती भाभींचं माहेर ( ढिमोले ) हिंदी भाषिक ब्राम्हण समाजाशी संबंधित.सरांना मुलगा नसल्याने, लहान भावानी अन्त्य संस्कार करणं, हेच अपेक्षित.पण पाहता पाहता, सर्वांना वेगळंच दृश्य पहायला मिळालं.उपाध्याय आणि ढिमोले परिवारांनी निर्णय घेतला की अन्त्यसंस्काराचे सर्वच सोपस्कार पूजाच करेल.*
*त्याप्रमाणे,शव यात्रेसमोर आगट़ घेऊन चालणे,चितेला अग्नि देणे, नंतर , चितेला तीन प्रदक्षिणा घालून हंडी फोडणे हे सर्वच संस्कार पूजानेच पूर्ण केले.अंत्यसंस्कारात सहभागी झालेला ७/८०० चा जनसमुदाय हे सर्व उत्सुकतेनी न्याहाळत होता.कुणीही त्याबद्दल प्रश्र्न विचारला नाही,वाद घातला नाही.म्हणूनच म्हणावेसे वाटते, रुढी-परंपरा बदलवता येतात ; त्याला विरोध करुन नाही तर प्रसंगाप्रमाणे त्याला हळूवारपणे बाजूला करुनच !*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …