*कोरोना संपविण्यासाठी लसीकरणच उपाय—खासदार कृपाल तुमाने यांचे प्रतिपादन* *प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारा*

*कोरोना संपविण्यासाठी लसीकरणच उपाय—खासदार कृपाल तुमाने यांचे प्रतिपादन*

*प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर उभारा*

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

सावरगाव :- कोरोना विषाणू संपविण्यासाठी लसीकरण हाच एक उपाय आहे. त्यामुळे नरखेड तालुक्यातील प्रत्येकाने लसीकरण करुण घ्यावे वक्तव्य खासदार कृपाल तुमाने यांनी नरखेड पंचायत समिती सभागृहात नरखेड तालुक्याच्या आढावा बैठकीत केले.
या आढावा बैठकीला निलिमा रेवतकर सभापती नरखेड पंचायत समिती,माजी उपसभापती वैभव दळवी, तहसीलदार डी.जी.जाधव , खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड,पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे,तालुका आरोग्य अधिकारी विद्यानंद गायकवाड,मुख्यधिकारी पल्लवी राऊत,मुख्यधिकारी प्रविण मानकर,डॉ.हरीश महंत उपस्थित होते.


यावेळी नरखेड तालुक्यातील कोविड परिस्थितीचा खासदार कृपाल तुमाणे यांनी आढावा घेतला तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड रूग्णालय उभारण्याच्या सूचना आरोग्य अधिकारी यांना दिल्या.नरखेड ग्रामीण रूग्णालय येथील अॉक्सिजण पाईपलाईन लवकरात लवकर पुर्ण करण्याचे सांगितले तर नरखेड ग्रामीण रुग्णालयात लवकरच सी.टी. स्कॅन मशीन उपलब्ध करून देऊ असे सांगितले तर मोवाड व सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अॉक्सिजन काँसंट्रेटर मशीन कृपाल तुमाने यांच्या कडून देण्याचे तहसिलदार डी.जी.जाधव यांना सांगितले व ईतरही प्राथमिक आरोग्य केंद्रात ही मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांना गृहविलीगीकरण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.जे कोविड रुग्ण बाहेर फिरतअसतील त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे सांगितले.तालुक्यात लसीकरणाचा साठा लवकरच उपलब्ध होणार आहे.करिता लसीकरणासाठी जनजागृती करण्याच्या सूचना यावेळी दिल्या तर अँटिजन व आर.टी.पी.सी.आर टेस्ट वाढविण्याचे सांगितले.

या आढावा बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख राजु हरणे,शिवसेना तालुका प्रमुख हिंम्मत नखाते,युवासेना तालुकाप्रमुख ललित खंडेलवाल , हिराचंद कडू,हंसराज गिरडकर , मुन्ना राय,संजय बारमासे,रमेश रेवतकर व शिवसेनेचे ईतर नेते उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …