*पुढील आदेशा पर्यंत 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद*

*पुढील आदेशा पर्यंत 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर ः केन्द्र व राज्य शासनाने वाज्यागाज्याने सुरू केलेले 18 ते 44 वयोगटातील युवक युवतींचे लसीकरण मोहीम लसीच्या कमतरतेमुळे कोलमडून पडल्याने दि.12 मे पासून नोंदनी व 13 मे पासून लसीकरणाची मोहीम शासनाच्या पुढील आदेशापर्यंत स्थगीत करण्यात येत असल्याची माहीती पुढे येत आहे.

नागपुर जिल्ह्यातील 18ते 44 वयोगटातील युवक युवतीकरिता सावनेर,काटोल, कामठी व कन्हान या चार केन्द्रावर लसीकरणाची सोय जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य विभागाने उपलब्ध केली होती परंतू ग्रामीण भागातील युवक युवती करिता उपलब्ध आसलेल्या सावनेर शहरातील भालेराव हायस्कूल येथील केन्द्रावर सावनेर शहरच नव्हे तर तालुक्यातील युवक युवतींचे नोंदनी होत नसल्याने व सदर लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ शहरी भागातील युवक युवती उचलत असल्याने सदर लसीकरणाचा लाभ स्थानीकांनाच व्हावा याकरीता जिल्हापरिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे तसेच स्थानिक नेते मनोज बसवार,राजेश खंगारे आदींनी सदर प्रकार शासनाच्या लक्षात आणून दीला होता त्यानंतर ही स्थानिकांच्या नोंदणी होत नसल्याने सदर लसीकरण केन्द्रावर स्थानिकांचा तसा रोष निर्माण होताच परंतू आता लसींचा तुटवडा असल्याने सदर युवक युवतींचे लसीकरण बंद करण्यात आल्याचे परिपत्रक शासनाच्या आरोग्य विभागाने निर्गमित केल्याने सदर लसीकरण पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्याची माहीती असुन सदर विषयाला तहसीलदार सतिश मासाळ व उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दुजोरा दिला असुन शासनाच्या पुढील आदेशानुसार लसीकरणाला सुरुवात करण्यात येण्याची माहीती प्रसारमाध्यमांशी बोलताना दीली.


*तर युवा नेते मनोज बसवार यांनी कोलमडून पडत असलेल्या 18 ते 44 वयोगटातील युवक युवतींचे लसीकरणाची मोहीम राबवीण्यात घाई नकरता आधी नियोजन का करण्यात आले नाही. तसेच लसीकरण बंद होने म्हणजे शासनाच्या कार्यशुन्यतेचे प्रतिफळ आहे असा सवाल केला*


*18 ते 44 वयोगटातील लसीकरणाची मोहीम काही कालावधी करिता बंद पडल्याने विषेशतः ग्रामीण युवकांनमधे नाराजी चा सुर आहे.कारण की पुढील महिण्यापासून शेत हंगामास सुरुवात होईल व शेतकरी बांधव आपल्या शेतातील कामात व्यस्त असल्याने लसीकरणाचा लाभ घेण्याची शक्यता कमीच दिसून येते*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …