*अन्!भटक्या जमाती चे नागरिक पोहोचले लसीकरण केंद्रावर*
*88 नागरिकांनी घेतला लसीकरनाचा लाभ*
कोंढाळी- वाढत्या कोरोना संक्रमणमुळे गावागावात संक्रमण रुग्ण असून घरीच विलगिकरन करून राहतात त्यातील काही रुग्ण विलविकारणात घरी असताना बाहेर फिरत सल्यामुळे संक्रमण वाढतीवर आहे ही संक्रमनाची चैन तोडण्याकरिता प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर लसीकरण सुरू आहे याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना कोंढाळी परिसरातील तरोडा, जामगढ ,येथील भटक्या समाजातील नागरिकाचे गैर समजतीतून लसीकरण घेण्या करिता विरोध करीत होते. या बाबद ची माहीती याभागाचे आमदार व माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना समजली, तेव्हा त्यांनी काटोल चे तहसीलदार, बी डीओ
तालुका आरोग्य अधिकारी व ठाणेदारांनी सह स्थानिय स्वराज्य संस्थाचे पदाधीकारी यांनी संबधीताची लसीकरण घेण्याचे समजूत घालावी अशी सुचना केली. यावर 11 मे रोजी प्रशासन तरोडा व जामगढ येथे पोहचले गावात पोहचून या लोकांना कोरोना संक्रमण चैन तोडण्याकरिता लसीकर्णच प्रतिबंध उपचार महत्त्वाचे आहे या करिता येथील जनतेला लसीकरण करण्याचे आव्हान करण्यात आले.
11 मे ला तरोडा -जामगढ़ येथे राहणाऱ्या भटक्या जमाती तील काही लोकांचा लसीकरणाला तीव्र विरोध दर्शवला होता , तेव्हा येथील भटक्या जमातीतील किस्मत चव्हाण व त्यांचे युवक सहकारी काही जेष्ठ मंडळी ना प्रशासनिक आधिकारी तहसील अजय चरडे, ठाणेदार विश्वास पुलरवार, बी डी यो संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे आरोग्य अधिकारी डाक्टर जयश्री वाळके यांनी संबधीताची समजूत घालून 12मे रोजी जामगढ़ येथे लसीकरण व कोविड तपाणी शीबीर लावले, अन् भटक्या जमातीतील 65वर्षीय रेखाबाई शालिकराम चव्हाण या महिलेने मुलगा किस्मत चव्हाण सोबत शीबीराव पोहोचलो व लसीकरन केले. या नंतर अनेकांनी कोविड चे लसीकरण करवून घेतले, तर अनेकांनी कोविड तपासी केली सर्वात आधी लसीकरन करवून घेतले, तर जामगढ़ येथे स्थानिक लसीकरणाला विरोध करीत असलेल्या स्त्री-पुरुषांना स्थानिक जनप्रतिनिधी सरपंच उषाताई धम्मरक्षित वाहने , माजी सभापती विजयसिंह रणनवरे, पं स सदस्य लता धारपुरे, ग्रा प सदस्य गुनवंतराव खवसे, किस्मत चव्हाण कैलास सुर्यवंशी, तथा ग्रा प सदस्य येथील भटक्या जमातीतील ग्रा प सदस्य तरुण किस्मत चव्हाण तसेच युवकांनी लसीकरण करण्याचे आव्हान केले, 12मे रोजी जामगढ़ येथे संपन्न लसीकरन केंद्रावर 88लोकांनी लसीकरण करवून घेतले. या प्रसंगी नागपुर जि प चे उप मुख्याधिकारी राजेंद्र भुयार ही उपस्थित होत.