*बोगस रजिस्ट्रेशन करून धान व्यापाऱ्यांना लाभ करून देणाऱ्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन च्या अधिकाऱ्यांवर व घोटच्या व्यवस्थापकावर कठोर कार्यवाही करा – आमदार डॉक्टर देवरावजी होळी*
*धानाची प्रत्यक्ष खरेदी न करता केवळ सातबारांवर आँनलाईन नोंदणी*
*मात्र २ महिन्यांपासून प्रत्यक्ष धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे अजूनही ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नाही*
*धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे व बोनस तातडीने द्यावे*
*जिल्हा फेडरेशनच्या धान खरेदी प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी*
गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गडचिरोली – जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला धान विक्री करून २ महिन्यांचा कालावधी होऊनही त्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले नाही परंतु धानाची प्रत्यक्ष खरेदी न करता केवळ सातबारांवर आँनलाईन रजिस्ट्रेशन करून व्यापाऱ्यांना लाभ मिळवून देणाऱ्या व शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांवर व घोट येथील व्यवस्थापकावर तसेच संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली आहे*
*व्यवस्थापक घोट , अमीर्झा व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे व जाणीवपूर्वक कृतीतून अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेले नाही, मात्र धानाची प्रत्यक्ष खरेदी न करता केवळ सातबारांवर हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे आँनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आल्याची गंभिर बाब पूढे आली आहे. मागील दीड-दोन महिन्यांपासून ज्या शेतकऱ्यांनी धान विक्री केली त्या शेतकऱ्यांचे सातबारा जमा करण्यात आले मात्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले नाही. परंतु जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष धान खरेदी न करता कृषि उत्पन्न बाजार समिती चामोर्शी व गडचिरोली येथील ५०० शेतकऱ्यांचे, अमिर्झा केंद्रातून २०० शेतकऱ्यांचे तर घोट केंद्रावरून ६० शेतकऱ्यांचे अशा जवळपास हजारावर शेतकऱ्यांचे केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. माञ ज्या शेतकऱ्यांनी धानाची प्रत्यक्षात विक्री केली त्या शेतकऱ्यांचे सातबारा जमा केले परंतु ऑनलाइन रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही त्यामुळे त्यांच्या धानाचे चुकारे व त्यांना बोनस अजून पर्यंत मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय झालेला आहे. यामध्ये चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती , प्रशासक , घोटचे व्यवस्थापक व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांचे संगनमत आहे. धान खरेदी केंद्रावर व गोडाऊन वर धाड टाकल्यास नोंदणी न झालेल्या मात्र प्रत्यक्षात विक्री केलेल्या शेतकऱ्यांचेच धान सापडेल . त्यातून प्रत्यक्ष धान खरेदी न करता सातबारावर नोंदणी झालेल्या धानाची सत्यता पुढे येईल त्यामुळे या केंद्रावर तातडीने धाड टाकण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे*
*जिल्ह्यातील फेडरेशनच्या वतीने करण्यात येणाऱ्या धान खरेदी प्रक्रियेमध्ये नियमितपणे मोठा भ्रष्टाचार सुरू असून खऱ्या शेतकऱ्यांना वगळून केवळ मोठ्या व्यापाऱ्यांचे धान खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्फत खरेदी करण्यात आलेल्या धानाची व सातबाराची चौकशी करावी व या प्रकरणात दोषी असणाऱ्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी व घोट येथील व्यवस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सभापती, प्रशासक यांचेवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी शासनाला पत्राद्वारे केली आहे*
*तसेच दोन महिन्यांपासून धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे धानाचे तातडीने चुकारे व बोनस उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना भाजपा तालुका अध्यक्ष राम रामरतन जी गोहणे, डॉक्टर प्रमोदजी धारणे, भास्करजी नागापुरे, नेताजी अलाम, भास्कर ठाकरे, आमिन पठाण भोसले, मेहमूद पठाण,पत्रुजी चौधरी जगदीश पेंदाम यांनी निवेदन दिले*