*अनाथांची आई येणार सावनेर ला…*
*गांधी जयंती निमित्त आयोजित दिंडी यात्रेत होणार सहभागी*
*सावनेरः नगरीतील समाजसेवी गोपाल घटे यांच्या प्रयत्नातुन मागील अनेक वर्षा पासुन गांधी जयंतीच्या पर्वावर होत असलेल्या सदर आयोजनास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन समाजात विशिष्ट कार्य करुण स्वताला समाजसेवेत वाहुन घेणार्यांचा सत्कार घडवून आनतित याच अनुशंगाने येत्या 2 आक्टोंबर ला जेष्ठ समाजसेवी,अनाथांची आई म्हणून ख्यातीप्राप्त सिंधूताई सपकाळ यांची उपस्थिती व प्रबोधन ऐकून घेण्या करीता सावनेर करांमधे उत्साह संचारला आहे…*
*सिंधूताई सपकाळ हे केवळ एक नाव नसून अनाथांच्या,उपेक्षितांच्या तसेच वंचितांचा जगण्याची नवी उमेद देणारा अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत आहे.आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.*
*७० वर्षीय महिला आपल्या भूतकाळातील वेदनादायक प्रसंग मागे टाकून प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वासाने अनाथांच्या समस्यांचे निराकरण करत आहे.त्यामुळेच त्यांना ‘अनाथांच्या आई’ नावाने संबोधले जाते.त्यांच्या वयक्तिक जीवनात डोकावुन बघितल्यास त्यांनी त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या आयुष्यात किती संकटे आलीत व किती त्याचा त्रास झाला याचा आपण अंदाज लावू शकतो.अनेक वाईट अनुभवांचा तोंड देत आलेल्या माईंच्या चेहऱ्यावर आपण विलक्षण आत्मविश्वास बघून प्रेरित होऊ शकतो यात काहीच दुमत नाही..!!*
*सिंधुताईंच्या ह्याच धैर्यवान आणि त्याकामात झोकून दिलेल्या व्यक्तीतत्वामुळे त्यांना ५०० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत.त्यांना ह्या पुरस्कारातून जे काही रक्कम मिळते ती रक्कम त्या निस्वार्थी भावाने अनाथांना घर बांधून देण्यात तसेच शिक्षण करण्यात देते. त्या मुलांच्या स्वप्नांना अजून चांगला आकार कसा देता येईल यामध्ये सिंधुताई सतत प्रयत्नशील असतात….!!*
*2 आक्टोंबर रोजी होणार्या सदर आयोजनास जास्तीइ जास्त नागरिकांनी उपस्थित राहुन आईचा आशीर्वाद व प्रबोधनाचा लाभ घ्यावा अशी विनंती गोपाल घटे यांनी पत्रपरिषदेतुन केली आहे*