*बी एस एन एल ची बत्ती गुल*
*अनेक ठिकाणी सेवा ठप्प*
*ग्रहकांना मनस्ताप*
*सावनेरः दुरसंचार क्षेत्रातील नामवंत भारतीय दुरसंचार सेवा आता आपल्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे.एकेकाळी घरोघरी असलेला व प्रतिष्ठा समझला जाणारा टेलीफोन,एसटीडी बुथ वर लागणार्या लांब लांब रांगा शासनाच्या व वरिष्ठांच्या आडमुठ धोरणामुळे घश्यामुखी पडल्या व बघता बघता भारतीय दुरसंचार व्यवस्थेला कधी न संपनारी गळती लागली व आजही राजरोस पणे सुरु आहे*
*सावनेर क्षेत्रातील टेलीफोन धारकांना योग्य सोयी सुविधा पुरवीण्या सावनेर दुरसंचार विभागात कमालीची दप्तर दिरंगाई असल्यामुळे टेलीफोन धारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.अनेक टेलीफोन संच बंद पडले असुन वारंवार लेखी तोंडी तक्रारी करुण सुध्दा कर्मचाऱ्यांना पाझर फुटत नाही तरीही महिन्याकाठी येणारे देयक मुकाट्याने भरावयास विवश आहेत त्याला नक्की कारण म्हणजे घरातील वयोवु्ध्द मंडळी कारण त्यांना स्मार्ट फोन वापरने अवघड जाते म्हणून ते आपल्या टेलीफोन चा लाड पुरवत असल्याचे चित्र आहे.*
*सावनेर दुरसंचार विभागातील गलथान कारभाराच्या अनेक तक्रारी व बातम्या वर्तमान पत्रात प्रकाशित होऊण सुध्दा पळसाला पानं तीनच व तक्रारघ करुण सुध्दा दखल घेणार कोण अशी अवस्था निर्माण झाली असल्यामुळे टेलीफोन धारकात रोष व्याप्त आहे.वरिष्ठांनी वेळीच दखल घेतली नाही तर सावनेर परिसरातील अनेक ग्राहक आपल्या लाडक्या टेलीफोन ला शेवटचा राम राम घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जात आहे..*