*निवृत्ती वेतनाअभावी त्या शिक्षकावर उपासमारीची वेळ* *वित्त विभागाच्या चुकीमुळे थांबले एका निवृत्त शिक्षकाचे पेंशन*

*निवृत्ती वेतनाअभावी त्या शिक्षकावर उपासमारीची वेळ*

 

*वित्त विभागाच्या चुकीमुळे थांबले एका निवृत्त शिक्षकाचे पेंशन*

*कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर*

कन्हान : – नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी मधुन सेवानिवृत्त झालेले अशोक गुलाबराव पवार हे जिल्हा परिषद वित्त विभागाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या सहा महिन्यापासून निवृत्ती वेतनापासून वंचित आहेत. याबाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.


श्री.पवार हे ३१ ऑगस्ट २०१९ रोजी नियत वयो मानानुसार पंचायत समिती पारशिवनी मधुन सहायक शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले. ऑक्टोबर २०२० पर्यंत पारशिवनी पंचायत समिती मधुन निवृत्ती वेतन घेत होते. त्यांचे मुळ गाव तळेगाव ठाकुर तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथील असुन सध्या ते त्यांच्या मुळ गावी तळेगाव ठाकुर पं.स. तिवसा येथे वास्त व्याने राहत आहे. त्यामुळे त्यांनी निवृत्तीवेतन पं.स. तिवसा जिल्हा अमरावती येथे स्थानांतरीत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांचे निवृत्ती वेतन प्रकरण व निवृत्ती वेतन विषयक लाभाचे मंजुरी आदेश पी पीओ,(अ व ब) १२ डिसेंबर २०२१ ला पुढील कार्य वाहीसाठी जिल्हा परिषद अमरावती ला पोस्टा द्वारे पाठविण्यात आले व त्याची एक प्रत श्री पवार यांना ही मिळाली परंतु जिल्हा परिषद अमरावती येथे चौकशी केली असता गेल्या माहे डिसेंबर मध्ये पाठविण्यात आलेले निवृत्ती वेतन प्रकरण जिल्हा परिषद अमरावतीला प्राप्तच झाले नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली. नागपूुर जिल्हा परिषद मध्ये चौकशी केली असता प्रकरण पाठविण्यात आले परंतु एवढे महत्वाचे आदेश रजिस्टर पोस्ट न करता साध्या पोस्टने पाठविण्यात आल्यामुळे सदर्हु डाक सध्या कोठे पडली आहे. हे समजण्यास मार्ग नाही. वित्त विभागाच्या या दप्तर दिरंगाईचा फटका एका निवृत्त शिक्षकाला बसला. जवळचा होता नव्हता सर्व पैसा त्यांनी स्वगावी घर बांधण्यासाठी खर्च केला आणि अशातच गेल्या नोव्हेंबर २०२० पासुन त्यांना निवृत्तीवेतन न मिळाल्यामुळे त्यांचे कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली. सदर प्रकरणाबाबत तातडीने कार्यवाही करून संबंधित शिक्षकाला न्याय देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे सरचिटणीस विरेंद्र वाघमारे सह शिक्षक नेते गोपाल राव चरडे, रामु गोतमारे, सुनिल पेटकर, सुभाष गायधने, ज्ञानेश्वर वंजारी, आनंद गिरडकर, दिलीप जिभकाटे, आशा झिल्पे, सिंधु टिपरे, अनिल पाटील, अर्जुन धांडे, संतोष बुधबावरे, अशोक हटवार, हरिश्चंद्र रेवतकर, तुषार चरडे, वसंत बलकी, मनोज बोरकर, महिपाल बनगैया, विलास वनकर, रमेश गाढवे, सी.एस. वाघ आदि ने केली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …