*शेतीकरिता लागणार्या रासायनिक खतांचे वाढविलेले दर कमी करण्याची मागणी*
*ग्रामिण किसान काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष ओम प्रकाश काकडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- शेती लागवट हंगाम सुरु होण्यापुर्वी रासायनिक खतांच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडल्याने नागपुर जिल्हा ग्रामीण किसान व खेत मजदुर काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष ओमप्रकाश काकडे यांच्या नेतृत्वात काॅग्रेस पदाधिकार्यांनी व शेतकर्यानी पारशिवनी तहसीलदार मार्फत मा.श्री पंतप्रधानांना निवेदन देऊन रासायनिक खतांचे दर कमी करण्याची मागणी केली आहे.
ऐन शेती उत्पादना करिता साधन साहित्याची खरेदी करण्याच्या वेळेवर व शेती लागवन हंगाम सुरु होण्याआधीच रासायनिक खतांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली असुन खत कंपन्याकडुन दरवाढ होणार नाही असे सांगुन सुध्दा ही दर वाढ झाल्याने शेतकर्यान मध्ये भयंकर नाराजगी सह रोष व्यक्त करण्यात येत आहे . शेतकर्यांना वर्षानुवर्षा पासुन शेतमालास हमीभाव सुद्धा मिळत नसुन डीझेल, पेट्रोल व शेत मजुरी चे भाव वाढल्याने शेतकर्यांना आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षा पासुन दोन्ही हंगामातील पिकांची परिस्थिती लक्षात घेता आधीच कोरोना व दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यावर असतांना शेतमालाला भाव मिळत नसल्याने उपाशी पोटी मरण्याची पाळी येऊन ठेपली असुन संपुर्ण देशातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडल्याने नागपुर जिल्हा ग्रामीण किसान व खेत मजदूर काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष ओमप्रकाश काकडे यांच्या नेतृत्वात काॅग्रेस पदाधिकार्यांनी व शेतकर्यांनी पारशिवनी तहसिलदार मार्फत मा.श्री पंतप्रधानांना निवेदन देऊन रासायनिक खतांचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी जिवलग चव्हान, प्रमोद काकडे, देवरावजी ठाकरे, रविंन्द्र दोडके, राहुल वानखेडे, अमोल देऊळकर, राहुल काकडे, विजेंन्द्र गजभिये, अमजद पठान, विजय निकोसे सह शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.