*कोविड नियमावली चे काटेकोरपणे पालन करण्या खुर्सापार ग्रा प येथे पोहचले माजी गृहमंत्री अनिल देशमुख*
कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – कोविड १९या विषाणूला आपल्या गावात पाण्यापासून रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार च्या सर्व नियमावलींचे तंतोतंत पालन करून स्वतःच्या गावचे पॅटर्न राबवून खुर्सापार गावाला वर्षभरात कोरोना चा शिरकाव होऊ दिला नाही, याची दखल केंद्रसरकार कडून प्रकाशीत पंचायत राज या पुस्तकात नोंद करन्यात आलेल्या पुस्तिकेत खुर्सापार ग्रा प चे नांव नोदविले आहे. खुर्सापार ही ग्रा प काटोल विधानसभा मतदार संघात येते या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख 22मे रोजी खुर्सापार पोहोचले.
काटोल तालुक्यातील ग्रामिण भागात कोविड १९च्या दुसर्यालाटेने मोठ्या प्रमाणात कोविड चे संक्रमित आढळून आले, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य, राजस्व, पंचायत, व पोलीस विभागाने वेळोवेळी खबरदारी चे पाऊल चलले असले तरी यांतून सध्या स्थितीत संक्रमितांची संख्या आढळून येत आहे, यातच वैद्यकीय व वैज्ञानिकांनी आगामी ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात तिसर्या लाटेचा धोका जानवत असल्याचे सांगितले आहे. यावरून या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मतदारसंघातील काटोल तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील गावांना कोविड १९चे नियमावली व दिशानिर्देशांचे पालन करत 22मे रोजी दुपारनंतर मेंढेपठार(बाजार),कोंढासावळी, वाई, प्राथमिक आरोग्य केंद्र कचारी सावंगा, पंचधार, मेंढेपठार (जं),नांदोरा, खापा(सोनार), या गावांना भेटी देऊन या भागात कोविड १९चे व्यवस्थापनांची प्रत्यक्ष निरिक्षण व पाहणी केली, याप्रसंगी कचारी सावंगा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाक्टर मानेकर यांनी माहीती दिली, या नंतर कोविड १९चे संक्रमण काळात कोविड नियंत्रण व्यवस्थापन चोखपणे करून कोविड ला नियंत्रणात ठेवल्या बाबद देशातील २८०००ग्रामपंचयती पैकी तिसरा क्रमांक पटकून राज्यात, विदर्भात कोटल पंचायत समीती व मतदारसंघाचा मान वाढविलेल्या खुर्सापार ग्रा प येथे पोहचून गावकरी व ग्रा प सरपंच सुधिर गोतमारे उपसरपंच प्रदिप सलाम सर्व ग्रा प सदस्य व खुर्सापार येथील नगरिकांचे या प्रसंगी आभार मानले. तसेच खुर्सापार ग्रा प करिता समाजभवन बांधकामासाठी आमदार विकासनिधी मधून दहा लाख रूपये मंजूर केले तर कोविड प्रतिबंधाकरीता ऑक्सीजन कंसंट्रेटर देण्याची घोषणा केली सोबतच कोविड सुरक्षे करीता ७५लिटर सैनिटायजर भेट केले.
या प्रसंगी जि प चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, जि प सदस्य चंद्रशेखर कोल्हे, पं स मा उप सभापती योगेश गोतमारे, पं स सदस्य संजय डांगोरे, निशिकांत नागमोते, दुर्गाप्रसाद पांडे, कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे,उपसरपंच स्वप्निल व्यास, सतिश पुंजे, संजय राऊत,बाबा फिस्के ,अजय लाडसे, पोलीस पाटील रणजीत तायवाडे, मुन्ना पटेल तसेच संबधीत गावो गावचे पादाधिकारी तसेच राष्ट्रवादी कांग्रेस सह महाविकास आघाडी सरकार चे घटक पक्षांचे पदाधिकारी ही सोशल डिस्टंस्सींग चे पालन करत आप आपल्या गावात उपस्थित राहून कोविड संक्रमणाचे तिसर्या लाटेच्या नियंत्रणा बाबद माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सोबत चर्चा केल्या यावर आमदारांनी उपस्थित अधिकारी व पदाधीकारी यांना योग्य त्या सुचना केल्या. काटोल चे तहसीलदार अजय चरडे, नायब तहसीलदार निलेश कदम, संवर्ग अधिकारी संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाक्टर शशांक व्यव्हारे, अन्न पुरवठा अधिकारी कमलेश कुंभारे, सह संबधीत विभागांचे विभाग प्रमुख या दौर्यात सोबत होते, कोंढाळी चे ठाणेदार विश्वास पुलरवार यांनी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कार्यक्रमाचे संचालन ग्राम सेवक एस डी भादे यांनी केले.