*वीज कंत्राटी कामगार संघाचा कामबंद आंदोलनास पाठिंबा. फ्रंट लाईन वर्कर दर्जाची मागणी*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी – दिलीप येवले
नागपुर:- महावितरण, महापारेषण महानिर्मिती या वीज कंपनीतील 6 प्रमुख कायम कामगार संघटनांची वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती सोमवार दिनांक 24 मे पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहे.
आता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने दिनांक 22 मे रोजी या कायम कामगारांच्या कृती समितीला पाठिंबा जाहीर दिला असून कंत्राटी कामगार संघाचे सुमारे 12000 सदस्य या आंदोलनात 24 मे पासून सहभागी होणार असल्याने या आंदोलनाची बळकटी वाढणार आहे. या बाबतची नोटीस सर्व संबंधितांना देण्यात आली आहे.
या आंदोलनात कंत्राटी कामगार हिताच्या मागण्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे
*आंदोलनातील प्रमुख मागण्या*
1 ) वीज कंत्राटी कामगारांना सुद्धा फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन शासन लाभ मिळावेत
2 ) फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन कंत्राटी कामगारांच्या कुटुंबाला सुद्धा लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे
3 ) कोरोना बाधित कंत्राटी कामगाराला 30 ऐवजी 50 लाखाचे सानुग्रह अनुदान मिळावे
4 ) कोविडचा उद्रेक पाहता काळात वीज बिल वसुली सक्ती करू नये
या मागण्या कंत्राटी कामगार हिताच्या असल्याने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कृती समितीच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय एकमताने घेऊन जाहीर केला
कोविड काळात 46 कंत्राटी कामगार अपघाताने मृत पावले तर अनेक जण कोविड मूळे मृत पावले. शेकडो कंत्राटी कामगार व त्यांचे कुटुंबीय सुद्धा कोविड बाधित झाले, यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने जून 2020 पासून महाराष्ट्र शासन, ऊर्जामंत्री, उर्जामंत्रालय, प्रधान सचिव ऊर्जा, व तिन्ही वीज कंपनी प्रशासनाकडे हजारो पत्र व्यवहार केले. 5-6 आंदोलने , निदर्शने केली मात्र याकडे महाराष्ट्र शासन, ऊर्जामंत्री, उर्जामंत्रालय, प्रधान सचिव ऊर्जा, व तिन्ही वीज कंपनी प्रशासनाने आजवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
अशी मागणी
प्रदेश अध्यक्ष
निलेश देवराव खरात
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ,
संलग्न भारतीय मजदूर संघ
यांनी केली.