*शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्ज्याचे बी -बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत मा.डी.जी.जाधव तहसीलदार साहेबांना देण्यात आले निवेदन*
बेलोना प्रतिनिधी – चंद्रशेखर मस्के
नरखेड : शेतकऱ्यांचे अर्थचक्र हे पुर्णपणे खरीप हंगामाशी निगडीत असते. जर त्याचा खरीप हंगामाच बिघडला तर तो परत आर्थिक देवाणघेवाण करूच शकत नाही. त्याचे पुर्ण वर्ष वाया जाते व विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे
या खरीप हंगामात तरी कमीत कमी शेतकऱ्यांना पेरणीयोग्य उत्कृष्ट दर्जाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे.या करीता तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात गोळा होऊन कोरोनाचे नियम पाळत आपल्या शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार डी जी जाधव याना निवेदन दिले. या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात
शेतकरी गणेश एकनाथ ऊईके, विवेक रामाजी बालपांडे, अनिकेत सावंत, ज्ञानेश्वर मुलताईकर, राहुल सुरेश धुर्वे याचा समावेश होता. याच बरोबर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी याच्याकडे तक्रार दाखल केली होती. मागील खरीप हंगामात महाबिज कडून सोयाबीनच्या निकृष्ट दर्जाच्या बियाणांची विक्री करण्यात आली होती. त्या बियाण्यांची उगवण न झाल्याने व दूबार पेरणी फसल्यामळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. ती नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही. ती सुद्धा लवकरात लवकर मिळण्यात यावी याबाबत तहसीलदार याचे सोबत चर्चा करण्यात आली.