*तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही येथे बिबटयाचा मृत्यू*

*तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही येथे बिबटयाचा मृत्यू*

गोंदिया : गोंदिया वन विभागातील तिरोडा वनपरिक्षेत्रातील वडेगाव सहवनक्षेत्र अंतर्गत कोडेलोहारा बिटात मौजा माल्ही येथे झुडपी जंगलचे गट नंबर 270 येथे 19 मे 2021 रोजी अंदाजे दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वन कर्मचारी यांना गस्तीत जंगलात मृत बिबट आढळून आले असता क्षेत्र सहाय्यक एम.एम.कडवे यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली व त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के.आकरे यांना सायंकाळी दिली. दरम्यान अधून-मधून पाऊस सुरु होता व संध्याकाळ झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मृत बिबटचे शरीर त्याच ठिकाणी सुरक्षीत ठेवण्याच्या अनुषंगाने रात्रीचा बंदोबस्त तैनात केला.

20 मे 2021 रोजी सकाळी मृत बिबट असलेल्या घटनास्थळी उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहाय्यक वनसंरक्षक आर.आर.सदगीर, तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के.आकरे, एकोडी पशुधन विकास अधिकारी डॉ.विवेक गजरे, वडेगाव पशुधन विकास अधिकारी डॉ.विद्या वानखेडे, तिरोडा पशुधन विकास अधिकारी डॉ.रेणुका शेंडे, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांच्या चमू मार्फत मृत बिबटच्या शरीराची तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबटचे सर्व अवयव साबुत असल्याचे दिसून आले. उपस्थित चमुच्या मार्फत शवविच्छेदन करुन मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यात आला. तसेच आजुबाजूचे संपूर्ण जंगल परिसर वन कर्मचाऱ्यांच्या व श्वान रामू व नवेगाव-नागझीरा व्याघ्र प्रकल्पाचे श्वान पथकातील कर्मचारी श्री राऊत व इतर यांच्या मदतीने पिंजून काढण्यात आले.

प्राथमिक तपासात बिबटच्या छातीवर खोल जखम दिसून आली तसेच बिबटचा मृत्यू जखमेतून रक्तस्त्राव झाल्याने झाल्याचा अंदाज आहे. बिबटच्या मृत्यूचे सविस्तर कारण शोधण्यासाठी वैद्यकीय परिक्षणासाठी मृत बिबटच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले आहे. सदर मृत बिबटचे शवविच्छेदन झाल्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत मृत बिबटचे शरीर दहन करण्यात आले आहे. सदर घटनेचा सर्व दृष्टीकोनातून तपास सुरु आहे. असे सहाय्यक वनसंरक्षक, गोंदिया वनविभाग, गोंदिया यांनी कळविले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …