*मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणे सोपे*
विशेष प्रतिनिधि – विकास दुरगकर
नांदागोमुख – येथून दहा किलोमीटर अंतरावरील खुरसापार या गावापासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ची सीमा आहे नागपूर बैतुुल भोपाळ राज्यमार्ग क्रमांक ४७ या मार्गावर परिवहन विभागाची बॉर्डर आहे या बोर्डरवर फक्त चेकिंग होते परंतु महाराष्ट्र बॉर्डर वर खुरसापार या गावापासून मध्यप्रदेशातील साई खेडा हे गाव फक्त दोन किलोमीटर अंतर असून संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे या रस्त्याने दररोज कित्येक नागरिक टेम्पो आणि मोटरसायकलने महाराष्ट्रात जाणे-येणे करीत असतात या मार्गावरील बॉर्डरवर केळवद पोलीस स्टेशनचा व परिवहन विभागाचा एकही कर्मचारी राहत नाही.
शासनाने एकीकडे परराज्यातून येणाऱ्या साठी निगेटिव्ह असाल तरच परराज्यात प्रवेश हा नियम आहे परंतु आहे ‘ ब्रेक द चैन ‘ अंतर्गत लागू करण्यात आलेला कडक निर्बंध येथे पूर्णता बंधन कारक आहे का…?
आर .टी .पी .सी. आर .चाचणी बंधनकारक आहे का…? हे सर्व नियम कागदावरच आहे का ..?
असे प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे हा मार्ग सरळ रेमंड बोरगाव , रायसोनी कॉलेज , जामसावडी ,सैसर ,छिंदवाडा येथे जातो सायखेडा या गावातून महाराष्ट्रात यायला दोन रस्ते आहे एक खुर्सापार दुसरा येलकापार सावळी या मार्गाने बाराही महिने बिनधास्त चोरटी वाहतूक सुरू राहते या रस्त्यांना आळा बसला तर नागपूर जिल्ह्यात कोणाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो असे असंख्य नागरिकांनी प्रतिनिधी जवळ बोलून दाखवले.