*अखेर धडक सिंचन विहिरीचेअनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात गटविकास अधिकारी जमदाडे यांचं गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करून आभार*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – दिनांक 24 /05/2021 रोज सोमवारी युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे शहर अध्यक्ष कमलेश चिंधेकर यानी पंचायत समिती आर्वी येथे भेट देत धडक सिंचन विहीर चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत काय कार्यवाही झाली याबाबत आढावा घ्यायला पोहचले यावेळी आर्वी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी जमदाडे यानी दिलेल्या माहिती नुसार आर्वी तालुक्यातील 85 टक्के आणि आष्टी तालुक्यातील जवळ जवळ 100 टक्के शेतकरी
यांच्या बिलिंग तय्यार झालेली असून सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची सकारात्मक माहिती दिली यावेळी चर्चेत सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत, व पंचायत समिती आर्वी चे विद्यमान सभापती हनुमंत चरडे हे सुद्धा सहभागी झालेत आणि सकारात्मक चर्चा केली तसेच सर्व कागदोपत्री पत्री माहिती यावेळी गटविकास अधिकारी यानी समोर ठेवली यात पंचायत समिती आर्वी, लघु सिंचन विभाग व बांधकाम विभागातील सर्व देयकांची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने युवा स्वाभिमान च्या वतीने समाधान व्यक्त करत तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु अधिकारी वर्गाने या तीन दिवसात कामाचा वेग वाढवून पूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याने सर्व स्वाभिमानी सैनिक व धडक सिंचन विहिर अनुदान शेतकरी यांना मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असलेले संघटना समाधानी झाल्याने यावेळी चांगल्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे या भूमिकेतुन पंचायत समिती आर्वी चे गटविकास अधिकारी जमदाडे यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत, पंचायत समिती सभापती हनुमंत चरडे, युवा स्वाभिमान चे दिलीप पोटफोडे कमलेश चिंधेकर, सिद्धार्थ कळंबे,वासुदेव सपकाळ, जयंत गभणे, राजु बोरकुठे, शंकर हत्तीमारे,शरद सहारे, सूरज मेश्राम, व शेतकरी उपस्थित होते