*निराधाररांची उत्पन्न मर्यादा वाढवुन द्या.निराधार संघठनेच्या अध्यक्ष मंगलाताई ठक यांचे मुख्यमंत्राकडे निवेदन*
हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
हिंगणघाट – देशभरात कोरोना नी हाहाकार घातला आहे. व बरेच निराधार गरजू लोकांपर्यंत शासन व प्रशासन पोहचू शकत नाही, अशा निराधार , अपंग, महीला व म्हाताऱ्या लोकान पर्यंत संघटने चे पदाधिकारी जावून शोधून काढत आहे .व त्यांना योजनांची माहिती व योजना त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे . गेल्या 2012 पासून ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेनं या कामासाठी स्वतःला झोकून दिलं आहे . निराधारांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून निराधारांना न्याय देण्याचे काम संघठना गेल्या कित्तेक वर्षांपासून करीत आहोत .
हे काम करत असतांना असे निदर्शनास आले की निराधरांची उत्पन्न मर्यादा गेल्या कित्तेक वर्षापासून शासनाने 21000 रू निर्धारित केली आहे . परंतु 21000रु जर निरधारांची उत्पन्न मर्यादा शासन ठरवतो तर एक दिवसा प्रमाणे 29 रुपयात दोन वेळचे जेवण या महागाईच्या काळात निराधार बांधव कसे करतील? आणि दवाखाना , खानपान ,औषधी या सगळ्या गोष्टी कशा करतील? म्हणून अध्यक्ष या नात्याने शासनाला वारंवार पत्र लिहून लक्षात आणून दिले ,परंतु शासनाने निराधारांच्या उत्पन्न मर्यादा अद्याप वाढवून दिली नाही
एकीकडे शासन 21000रू रुपयाचा निराधारांना दाखला मागतो तर दुसरीकडे 21000रु दाखला देण्यास नकार देतो असे किती दिवस चालणार? म्हणून शासनाने निराधारांची उत्पन्न मर्यादा 21000 रु वरून वाढून किमान 50000 रू करून देण्यात यावी. महागाईचा काळ बघता ,अध्यक्ष या नात्याने.
मा. श्री उध्दवजी ठाकरे (मुख्य मंत्री),
मा. श्री सुनिलजी केदार (पालक मंत्री,वर्धा जिल्हा) यांना विभागीय अधिकारी यांचा मार्फत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात आपलीच सरकार आहे . निराधार संघटने सोबतच मी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे कार्यभार सांभाळते म्हणून मी आपल्याच सरकारला अतिशय नम्रपणे असी मागणी घालते आपण ती मान्य करावी अशी अपेक्षेचे निवेदन देण्यात आले