*स्वच्छ पर्यावरणाकरिता सूक्ष्मजंतूची भूमिका या चर्चासत्राचे अभ्यासपूर्ण वातावरणात उदघाटन संपन्न *

*स्वच्छ पर्यावरणाकरिता सूक्ष्मजंतूची भूमिका या चर्चासत्राचे अभ्यासपूर्ण वातावरणात उदघाटन संपन्न *

*कोराडी प्रतिनिधि -दिलीप येवले *

कोराडी येथील श्री सच्‍चिदानंद शिक्षण संस्थाद्‍वारा संचालित तायवाडे महाविद्यालय येथे सूक्ष्मजीवशास्त्र संस्था भारत यांच्या संयुक्त विद्यमाने *

स्वच्छ पर्यावरण याकरिता सूक्ष्मजंतूंची भूमिका

या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले .या चर्चासत्राच्या उद् घाटनप्रसंगी संस्था अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे अध्यक्षस्थानी होते, याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर चे कुलगुरू डॉ.सिद्धार्थ विनायक काणे, श्री श्री फौंडेशनचे अध्यक्ष श्री संकेत बावनकुळे, सूक्ष्मजीवशास्त्र संस्था भारत येथील अध्यक्ष डॉ.ए.एम . देशमुख, आर.एल.टी.कॉलेज अकोला येथील प्राचार्य डॉ.विजय नानोटी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमात सूक्ष्मजीव शास्त्रातील विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाची भूमिका महत्त्वाची कशी आहे , तसेच नवीन पिढीला सूक्ष्मजीव जंतूंच्या माध्यमातून पर्यावरणाची स्वच्छता कशी होणार ? हे कळण्‍यासाठी हे चर्चासत्र फारच प्रेरक ठरणारे आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाचा आज सर्व शास्त्राची कसा जवळचा संबंध आहे हे उलगडून दाखविले. प्राचार्य विजय नानोटी यांनी सूक्ष्मजीवशास्त्र चर्चेमागील भूमिका स्पष्ट केली.डॉ.ए. एम. देशमुख यांनी सूक्ष्मजीवशास्त्र हे मानवी समाज जीवन समृद्ध करणारे शास्त्र कसे आहेत हे मार्मिकपणे प्रकट केले.याप्रसंगी स्‍वागतपर भाषण महाविद्‍यालयाच्‍या प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे यांनी केले,त्‍यांनी महाविद्‍यालयाच्‍या गुणवत्‍तेचा २५ वर्षाचा चढता आलेख स्‍पष्‍ट केला.या चर्चासत्राचे प्रास्‍ताविक डॉ.विजय चरडे यांनी केले.आभार डॉ.सुवर्णा पाटील यांनी मानले.या चर्चासत्राला महाराष्‍ट्रातील अनेक महाविद्‍यालयातील संशोधक,प्राध्‍यापक बहुसंख्येने उपस्‍थित होते.या चर्चासत्राच्‍या यशस्‍वितेसाठी तायवाडे महाविद्‍यालयातील सर्व प्राध्‍यापकांनी सहकार्य केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …