*वराडा येथे अवैद्य देशी दारू विक्री वर कन्हान पोलीसांची धाड*
*कारवाई दरम्यान १० निपा देशी दारू भिंगरी व एक्टीवा स्कुटी सह एकुण ७०,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत वराडा येथे शिव मंदिर जवळ एक इसम आपल्या पांढर्या रंगाचा एक्टीवा स्कुटी मध्ये दारु ठेवुन विक्री करण्याची गुप्त माहिती कन्हान पोलीसांना मिळाल्याने पोलीसांनी वराडा येथे शिव मंदिर जवळ धाड मारुन दारु विक्री करतांना एक इसम आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी जवळुन देशी दारू भिंगरी सत्रा नंबर एक च्या १० निपा व एक्टीवा स्कुटी सह एकुण ७०,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ही कारवाई करण्यात आली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक २४ मे २०२१ ला रात्री ०७:०० ते ०७:४५ वाजता च्या सुमारास कन्हान पोलीसांना दारु विक्री ची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीसांनी वराडा येथे शिव मंदिर जवळ धाड मारुन आरोपी सुनिल अजबराव देवुलकर वय ३४ वर्ष राहणार शंकर नगर कन्हान हा आपल्या पांढर्या रंगाचा एक्टीवा स्कुटी क्रमांक एम एच ४० बी एस ०५८० मध्ये दारु ठेवुन विक्री करतांना मिळुन आल्याने त्याचा एक्टीवा स्कुटी च्या डिक्कीतुन १० निपा देशी दारू भिंगरी सत्रा नंबर एक एकुण १८० एम एल प्रमाणे १८०० एम एल किंमत ६०० रुपए प्रमाणे एकुण ६०० रुपए चा माल अवैध रित्या बीना परवाना मिळुन आल्याने त्याचा जवळुन एक्टीवा स्कुटी किंमत ७०,००० रुपए व दारु ची किंमत ६०० रुपए असा एकुण ७०,६०० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने सरकार तर्फे फिर्यादी स.फौ येथु जोसेफ बक्कन नंबर ११६ पोलीस स्टेशन कन्हान यांच्या तक्रारी वरुन आरोपी सुनिल अजबराव देवुलकर विरुद्ध कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंद करून तपासात आहे . तसेच आरोपी सुनिल अजबराव देवुलकर याला दोषारोप पत्र कोर्टात पेश करते वेळी हजर राहण्याची समज देऊन सोडण्यात आले .