*गरीब गरजुंना फळ वाटप*
*मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपनी मदती चा हाथ द्या*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राज्य शासना द्वारे नगर परिषद क्षेत्रात एक जुन पर्यंत लाॅकडाऊन वाढल्याने गरीब , मजदुर सारख्या लोकांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्याने सामाजिक युवा संघटन चे अध्यक्ष विक्की जिभकाटे यांच्या उपस्थिति मध्ये गरीब गजुंना फळ वाटप करण्यात आले .
देशात , राज्यात , जिल्ह्यात , शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासना द्वारे नगर परिषद क्षेत्रात एक जुन पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आल्याने जिल्हाधिकारी यांचा आदेशानुसार कन्हान – पिपरी नगरपरिषद क्षेत्रात एक जुन पर्यंत लाॅकडाऊन वाढल्याने शहरातल्या गरीब , मजदुर सारख्या लोकांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ निर्माण झाल्याने सामाजिक युवा संघटन चे अध्यक्ष विक्की जिभकाटे यांच्या उपस्थिति मध्ये सोमवार दिनांक २४ मे ला रेल्वे फाटक कन्हान च्या हनुमान मंदिरात बसलेल्या गरजु गरीब मजदुरांना फळ वाटप करण्यात आले .
या प्रसंगी विक्की जिभकाटे , रितेश देशमुख , हर्ष पाटील विक्की ठाकुर , विनोद किरपान , सह आदि नागरिक उपस्थित होते .