*बापने चिमुकल्या सत्यम ला दगडावर आपटून केले ठार*
*खापा पोलिस स्टेशन अंतर्गत वाकोडी येथील घटना*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – तालुक्यातील खापा पोलिस स्टेशन हद्दीतील वाकोडी येथे आज सकाळी दहा वाजता चे दरम्यान ढिवर मोहल्ला येथे एका इसमाने आपल्या एक वर्षाच्या मुलाची अमानुषरीत्या दगडावर आपटून हत्या केली.
ही ह्रदयविकारक घटना खापा पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी येथे घडली हकीगत अशी की वाकोडी तालुका सावनेर येथे आरोपी भजन मेहता कौरती वय 40 यांनी आपल्या लहान मुलाची मृतकाचे नाव सत्यम भजन कौरती वय एक वर्ष याची दगडावर आपटून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला दारूचे व्यसन असुन त्याने पत्नी मथुरा हीला दारू पिण्याकरता पैसे मागत होता त्यावरून पती-पत्नीचे जोरदार भांडण झाले त्या भांडणांमध्ये मला मुलगी पाहिजे होती पण तुला मुलगा झाला यावरून निर्दयी बापाने चिमुकल्या मुलाला बाहेर काढून दगडावर तीन चार दा आपटल्याने त्या निरागस मुलाचा जागीच मृत्यू झाला फिर्यादी त्याची पत्नी हिच्या बयाना वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई ठाणेदार अजय मानकर करीत आहे.