*पाणीपुरवठा सुरळीत करा…! अन्यथा नगर पालिका प्रशासन घागर आंदोलनाला तयार रहा*
हिंगणघाट प्रतिनीधी- भाऊराव कोटकर
हिंगणघाट – एकता प्रतिष्ठान तुकडोजी वार्ड हिंगणघाट तर्फे आज दिनांक २६ में २०२१ रोजी नगरपालिका हिंगणघाट कडे मागणी करुन चंद्रकांत पाटील (प्रशासकिय अधिकारी)साहेबांना निवेदन सादर,
मागिल काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक ०६ (आदर्श नगर, प्रज्ञा नगर, संतक्रुपा नगर) मधे पाण्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी दरदर भटकावे लागत आहे, यामध्ये नगर पालिका प्रशासन कडुन अद्यापही काहीच मदत मिळाली नाही,व काहीच उपाय योजना सुद्या केलेली नाही.
प्रभागातील नगर सेवकांकडे याबाबत माहीती मांगितल्यास मुख्याधिकारींना जाब विचारा असे उत्तर दिल्या जाते .
मग जनतेनी अपेक्षा कुणाकडून करावी .पाण्यावर कर (ट्याक्स)घेनारी नगरपालिका कडुन की जनतेने निवडुन दिलेल्या लोकप्रतिनीधी , नगर सेवकां कडुन?
मानवी जीवनात पाण्याविना काहीच शक्य नाही.
दरवर्षी प्रमाणे यंदा ही नगर पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक ०६ वर दुर्लक्ष करत आहे असं स्पष्टपणे दिसून येते, उन्हाच्या तडाख्याने लोकांच्या विहीरी आटल्या असुन नळाला सुद्धा पाणी येईना, आम्ही तुम्हाला आमच्या हक्काचं पाणी मागतोय ते तुम्ही कसल्याही परिस्थितीत उपलब्ध करुन द्यावे ,
अन्यथा नाईलाजाने प्रभागातील जनतेला व महिलांना घागर घेऊन नगरपालिकेची वाट धरुण एक मोठ आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा एकता प्रतिष्ठान हिंगणघाट च्या वतीने देण्यात आले.
निवेदन सादर करताना एकता प्रतिष्ठान प्रमुख अखिल धाबर्डे, भाऊराव कोटकर, सुनील दीवे, प्रविण शंभरकर, प्रफुल क्षिरसागर, प्रतिक वासेकर, संदेश थुल, शैलेश चांदुरकर, प्रज्वल गायकवाड, अमीत कांबळे, अजीत कांबळे, रोहीत कांबळे, चेतन घुसे, अंकीत मुन, शुभम बंसोड इत्यादी उपस्थित होते.