*कै.राम गणेश गडकरी यांची जयंती साजरी*
*मराठमोळ्या थोर नाटककारास विनम्र अभिवादन*
सावनेर प्रतिनिधी – दिनेश चौरसीया*
सावनेरः थोर साहित्यिक नाटककार व आपल्या अमुल्य लेखनी ने मराठी भाषेला सात समुद्र पार लौकिक करूण “शेक्सपिअर” च्या नावाने ओळखले जाणारे कै.राम गणेश गडकरी यांच्या 135 व्या जयंती निमित्त कै.राम गणेश गडकरी युवा मंचच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली*
*त्याच प्रमाणे गणेश वाचनालय, राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालय येथे ही भाषाप्रभू ला स्मरण करुण आदरांजली वाहण्यात आली*
*दुसर्या चरणाच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सोशल डिस्टंसींग व गर्दीचे ठीकाण टाळण्याच्या सुचनेचे पालन करुण सर्व गडकरी प्रेमींनी सकाळी 9-00 वाजता आपल्या घरीच कै.राम गणेश गडकरी यांचे स्मरण करुण आदरांजली वाहून कै.राम गणेश गडकरी जयंती साजरी केली*
*गणेश वाचनालय चे अध्यक्ष अँड् चंद्रशेखर बरेठीया,विश्वस्त मंडळाचे अँड् श्रीकांत पांडे,अँड् पुरे,रधुनंदन जामदार व विश्वस्त.कै.राम गणेश गडकरी युवा मंच चे संस्थापक किशोर ढुंढेले, प्रथमेश देशपांडे,रवी काळबांडे, मयुरेश देशपांडे, दिनेश चौरसीया आदिंनी आप-आपल्या घरीच कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस उजाळा देत त्याची जयंती साजरी केली*